स्पर्धेसाठी
चैतन्याची गुढी
आले आले नववर्ष आले,
नव आकांक्षांना बळ मिळाले.
ऊभारुया नवचैतन्याची गुढी,
गतसालातून अनुभव साहीले.
चैतन्य दाटले मनोमनी,
हर्ष झाला तनामनाला.
नवक्रांतीची मशाल घेऊन,
सिद्ध अविचार गाडण्याला.
गुढी देतसे चैतन्य जीवाला,
होतो नाहीसा कडवटपणा.
प्रेम,जिव्हाळा लागतो लागे,
अंगी बाणतो चांगुलपणा.
पूजन देवादिकांचे करुन,
पूजनीय गुढीला वंदूया.
साखरमाळा गळा शोभती,
नववसने आनंदे अर्पूया.
स्विकारुन नवविचारांना,
जीवन अवघे फुलवूया.
चला बाणवू माणुसकी आज,
मानवतेची गुढी उभारुया.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment