स्पर्धेसाठी
स्वयंसिद्धा
जगी थोर मातृशक्ती ,
लहान असो वा थोर.
राव असो वा रंक ,
नसे जीवाला कधी घोर.
आहे स्वयंसिद्धा नारी,
टाकती पाऊल पुढे यशाचे.
क्षेत्र न ऊरले परके तिजला,
गाती कवने तिच्या यशाचे.
जिजाऊ, अहिल्या ,सावित्री,
प्रेरणाज्योती जागवतात.
कल्पना, सुनिता कर्तृत्वाने,
मार्ग यशाचा दाखवतात.
लढली झाँसी पराक्रमाने,
अफाट साहसाची मूर्ती.
तलवारीच्या कौशल्याने,
जगी पसरवली कीर्ती.
स्वयंसिद्ध स्वकर्तुत्वाने,
लढती जगी साहसाने.
जरी बसले जगी पदोपदी,
लांडगे पेटलेले वासनेने.
राजकारण वा समाजकारण,
यशवंत तू होतच आहेस.
जपून तूझ्या शिलाला सदा,
गवसणी आकाशी घालत आहेस.
नाही अबला , मी सबला,
इतिहासाची परंपरा थोर.
साथ जगाची मिळो ना मिळो,
चालते पुढे मी बिनघोर.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment