काव्यस्पर्धेसाठी
विषय -- जीवन नाट्य
जीवनाच्या प्रवाहात ,
भेटले अनेक सखेसोबती .
खरा माझा सोबती ,
निघून गेला वरती .
आठवणींच्या हिंदोळ्यावर ,
मन हेलकावे खाते .
वर खाली होताना ,
मन भारावून जाते .
जडावलेल्या अंतःकरणाने ,
मन माझे आक्रंदते .
पाहता चिमुकल्या जीवांना ,
बळेच ते शांत होते .
शोधून मग सापडत नाही ,
मनांत घट्ट रुतून बसतं .
भानावर येता लक्षात येतं ,
कटू सत्याचं ते वास्तव असतं .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment