Wednesday, 1 November 2017

बालकामगार

स्पर्धेसाठी

       बालकामगार

पाचवीलाच पुजलय यांच्या ,
गरीबी कुपोषण अपुऱ्या सोयी .
असहाय्य आईबाप राबती ,
मदतीला संगे घेऊन जाई .

बंधन कायद्याचे आले ,
वय चौदा अन् वेळेचे बंधन.
नियम फक्त कागदावरच ,
सरकारच्या डोळ्यात अंजन

शारीरिक कष्टाबरोबरच ,
होतय त्यांच लैंगिक शोषण.
आहे का वाली कुणी यांना ? का करतात फक्त भाषण ?

उज्वल भारताचे सुंदर स्वप्न
साकारण्या सज्ज होऊद्या .
जपू मानवतावाद , सोडुन स्वार्थ ,
जीवनात आनंदवन येऊ द्या.

बालकामगार शाप देशाला ,
समजते देशाची कुरुपता .
बालमनाला अलवार खुलवा
दाखवा देशाची सुंदरता .

  कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment