Friday, 3 November 2017

स्वयंशिस्त

स्पर्धेसाठी

     चित्रकाव्य

     स्वयंशिस्त

भाऊगर्दी वाहनांची ,
शहरात दिसते आहे .
शिस्तीच्या नावाचा पहा ,
सावळा गोंधळच आहे .

वाळवंटातील जहाज ,
कसा तो-यात चालतो .
शिस्त बाणली अंगी ,
कोण यांना सांगतो ?

बुद्धीमान मानव जगी ,
झेंडा तिन्ही जगी लावतो .
बेशिस्त वर्तनामुळे त्याच्या ,
जगी तो ओळखला जातो .

मुक्या प्राण्यांकडून आता ,
घ्यावा आम्ही चांगला धडा .
स्वयंशिस्त असते महत्त्वाची,
बेशिस्त तुम्ही आता सोडा .

वाहतुकीची झाली कोंडी ,
सगळेच अडले काम .
ऊंटाची ही रांग सांगते ,
कधी न होई रस्ता जाम .

  कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment