Sunday, 26 November 2017

भारताची राज्यघटना

स्पर्धेसाठी

विषय -- संविधान दिन

      भारताची राज्यघटना

सर्वोच्च कायदा भारताचा ,
घातला स्वशासनाचा पाया.
अध्यक्ष बाबासाहेब झाले ,
तयार मनूस्मृती गाडाया .

राज्यघटना भारताची खास,
कायदेशीर बाबी त्यात .
शिल्पकार ठरले ते महान,
आचरणाने उतरवले सत्यात

सम्मान संविधानाचा जगी,
मिरवतो झेंडा त्याचा मानाने
उदारमतवादी तत्वांचा मेळ,
घालून मिरवतो अभिमानाने.

सार्वभौम समाजवादी ही ,
धर्मनिरपेक्ष असे लोकशाही.
आचार विचारांचे स्वातंत्र्य ,
नाकारुन सवर्णांची दंडुकशाही .

झाली सुटका आपली आता,
मनूस्मृतीच्या विळख्यातून .
स्वातंत्र्य समता बंधुता ,
प्राप्त झाली प्रयत्नांतून .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

No comments:

Post a Comment