स्पर्धेसाठी
लेख स्पर्धा
स्वावलंबी जीवन
" आधी केले मग सांगीतले " असे म्हणतात ते अगदी बरोबरच आहे . कोणतेही काम असो मृग ते छोटे असूदे कींवा लहान ते काम आपण दुस-यांना सांगून करुन घेण्याऐवजी स्वतः केले तर तर ते काम केल्याचे एक वेगळे समाधान आपल्याला मिळतेच व दुस-यांना सांगताना आपण एका वेगळ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो.तेव्हा स्वावलंबन हे महत्वाचे आहे
स्वावलंबन म्हणजे आपण आपले कोणतेही काम असो दुस-यांच्याकडून करुन न घेता स्वतःच्या बळावर करणे होय .स्वावलंबनाने एकप्रकारचा आत्मविश्वास येतो . मग आपण कोणतेही काम सहज करु शकतो.त्यासाठी आपण स्वतःवर अवलंबून असले पाहिजे .
" स्वावलंबन " हे मूल्य आपण आपली मुले लहान असतानाच त्यांच्यात बिंबवली पाहिजेत . यासाठी आपल्या मुलांना सुरवातीला त्यांची स्वतःची छोटी छोटी कामे स्वतःच करायला सांगावी.सुरवातीला ती चुकतील , काही नुकसानही होईल पण ते आपण सोसलं पाहिजे , कारण यातूनच ती मुले शिकणार आहेत.आपण जी काळजी करतो ती आंधळी काळजी असते , तसे करुन आपण आपल्या मुलांना परावलंबी बनवत असतो हे आपल्या लक्षात येत नाही.
संसारातसुद्धा अनेक स्त्रिया या आपल्या पतिवर अवलंबून असतात . लहानसहान कामासाठी त्या अडून बसतात.काहीवेळा मग कुणी नसेल तर मग कामं खोळंबली जातात.बाकीच्यांना मग आपला नाकर्तेपणा जाणवतो.मग आपली कुचंबना सुरु होते व मग आपल्यावर दबाव आणला जातो, मग आपण त्यातच पिचत जातो.स्वावलंबनाने जर आपण वागले आपली कामे जर आपणच केली तर आपले एक स्थान निर्माण होते .आपला विचार केला जातो.वागताना विचाराने वागतात.
शाळेतही आपण विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे जर लिहून द्यायला लागलो तर मुले स्वतः अभ्यासच करणार नाहीत .व आयत्या उत्तराच्या प्रतिक्षेत स्वतः प्रयत्न करणार नाहीत .परिणामी वार्षिक परीक्षेत त्यांना अडचण येऊ शकते.त्यांना स्वतः उत्तरे शोधायला शिकवा म्हणजे ती अभ्यासात परिपूर्ण होतील व स्वावलंबी होतील.
स्वावलंबन हा अतिशय आवश्यक असा गुण आहे.जो आपल्याला या जगात मानाने , सन्मानाने जगायला शिकवतो.आपण कुणाच्या मिंद्यात रहात नाही.परावलंबी म्हणजे मृत व्यक्तीचे लक्षण आहे.जिवंत व्यक्ती नेहमी धडपडत असते.
मग आपण आपल्या जिवंतपणाची साक्ष देऊया .यासाठी परावलंबीत्व सोडून स्वावलंबी बणूया.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment