स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
काष्ठशिल्प
काष्ठशिल्प म्हणू की चित्र
अंदाज मी बांधत आहे .
कयासांच्या मेळ्यामध्ये ,
मन गोंधळून गेले आहे .
वाटते जसे की वृक्षाच्या ,
फांदीवर अवतरली ललना.
जणू सूर छेडते एकांतात ,
ओढ सख्याची तिच्या मना.
शांत निवांत प्रहरी ,
अलगुज सूर काढती .
वेलींच्या त्या वेढ्याने ,
काया ललनेची भासते .
निष्पर्ण रुक्ष काष्ठ ते ,
सुंदर आकार सुखावते .
भासे जणू घेऊन बासरी ,
अलवार ती वाजवते .
निसर्ग देतो प्रेमळ संदेश ,
प्रेम करावे सर्वांवर .
कुरुप जरी असला वृक्ष ,
प्रेम मात्र करतात शिल्पावर.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment