लेखस्पर्धा
विषय -- मराठी मातृभाषेचे महत्व
मातृभाषा म्हणजे आपल्या घरात आपले आईवडील परंपरेने जी भाषा बोलत आले आहेत ती भाषा होय .मराठी मातृभाषा असणारे व बोलणारे त्यात व्यवहार करणारे लोक भरपूर आहेत.त्यांची ती मातृभाषा असते .
जन्माला आल्यापासूनच मूल आपल्या आई-वडीलांच्यासारखेच ऐकून बोलायला शिकते.त्याला ती सहजसाध्य होते.मातृभाषेमधुन घेतलेले ज्ञान मुलांना फार लवकर समजते.
" मराठी असे अमुची मायबोली जरी ती राज्यभाषा नसे " असे कवि यशवंत म्हणतात यावरुनच मराठी भाषेचे महत्व लक्षात येते.मराठीत पहिली काव्यरचना ज्ञानेश्वरांनी केली व ज्ञानेश्वरीचा गोडवा व माधुर्य सा-या जगाला चाखायला दिला .संतानी मराठी भाषेला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करुन दिला .
मोगलकाळातही शिवाजी महाराजांनी आपला रयतेचा सारा कारभार मराठीतूनच ठेवला होता .स्वातंत्रवीरांनी मराठी भाषा ईंग्रजांच्या राजवटीत सुद्धा व्यवहारासाठी चालू ठेवली . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी महाराष्ट्राची भाषा झाली.
आज मराठीला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून ओळखली जाते.मराठी भाषा ही लवचिक असल्यामुळे प्रदेशानूसार ती बदलत जाते .दर बारा कोसावर , पंचविस कीलोमीटरवर बदलते.तिचा हेल बदलतो.कोकणी,घाटी,व-हाडी ई.अनेक प्रकारे ती ओळखली जाते.
मराठी भाषा बोलणा-या लोकांची संख्या पाहता मराठी भाषेचा जगात पंधरावा व भारतात चौथा क्रमांक लागतो.मराठी भाषा ईसवीसन ९०० पासून प्रचलित आहे.९ करोड लोकं ही भाषा बोलतात.देवनागरी ही मराठीची लिपी म्हणून ओळखली जाते.मराठीत साहित्यही भरपूर आहे.त्याचा ऊपयोग आपण करुन घेतला पाहिजे.
आज आपण पाहतो मराठी माध्यमांपेक्षा ईंग्रजी माध्यमाच्या शाळेंकडे लोकांचा ओढा जास्त दिसत आहे.त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे.ईंग्रजी माध्यमातील मुले मराठीचा उच्चार योग्यरीतीने करत नाहीत व मराठीचा बाज निघून जातो.त्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम वाटत नाही.
त्यामुळे आपणच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहीजे .आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात मराठीचाच जास्त वापर केला पाहिजे.
चला तर मग लागूया मराठीच्या विकासाच्या व समृद्धीच्या कामाला.
धन्यवाद
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाडता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment