Thursday, 30 November 2017

निर्मळ जीवन ( अभंग )

स्पर्धेसाठी

        अभंग प्रकार

       निर्मळ जीवन

असावे निर्मळ |
तन मन धन |
होईल जीवन |
आनंदाचे ||

द्वेष मोह राग |
सोडावा मत्सर |
आपण सत्वर |
सुधारण्या ||

दे सहानुभूती |
एकमेकाप्रती |
सफल जगती |
होण्यासाठी ||

आदर करावा |
सर्वांचा मानवा |
सोडुनी दानवा |
पाठीमागे  ||

मानवा जन्म हा |
एकदाच मिळे |
का न तुला कळे |
रीतभात ||

सत्याचीच कास
धरावी नेहमी |
तू मानवप्रेमी |
असावास ||

पाळ मानवता |
सदैव तू अंगी |
ईश्वराच्या रंगी |
रंगून जा ||

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530

स्पर्धेसाठी

सहज येऊन जाते कविता तिला पाहिल्यावर

शब्दसुमने ही आपसूकच फुलती ओठावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.
9881862530

Wednesday, 29 November 2017

वेळ ( काव्यांजली )

स्पर्धेसाठी

      काव्यांजली

विषय -- वेळ

महत्वाचा आहे
नेळ जपा सर्वाँनी
पटले मनोमनी
सर्वांना

गेलेला वेळ
नाही परत येत
नाही घेत
ध्यानात

केले काम
जर आपण वेळेत
यश शाळेत
मिळेल

यशाच्या वाटा
अवलंबून आहेत वेळेवर
ठेऊन ताळ्यावर
डोके

यशोशिखर गाठा
पाहून संधी तुम्ही
कौतुकाला आम्ही
हजर

यशस्वी भव
आशिर्वाद आहे सर्वांचा
वेळ पाळल्याचा
आनंद

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
9881862530

Tuesday, 28 November 2017

निसर्गातील खेळ

स्पर्धेसाठी

          चित्रचारोळी

निसर्गात चाले खेळ हा दोघांचा
ओंडक्याचा सहारा पुरे मजला
तू हवेत असा झेपावला उंच
नाही उपमा निखळ या प्रेमाला.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Sunday, 26 November 2017

स्वावलंबी जीवन

स्पर्धेसाठी

   लेख स्पर्धा

स्वावलंबी जीवन

     " आधी केले मग सांगीतले " असे म्हणतात ते अगदी बरोबरच आहे . कोणतेही काम असो मृग ते छोटे असूदे कींवा लहान ते काम आपण दुस-यांना सांगून करुन घेण्याऐवजी स्वतः केले तर तर ते काम केल्याचे एक वेगळे समाधान आपल्याला मिळतेच व दुस-यांना सांगताना आपण एका वेगळ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो.तेव्हा स्वावलंबन हे महत्वाचे आहे
   स्वावलंबन म्हणजे आपण आपले कोणतेही काम असो दुस-यांच्याकडून करुन न घेता स्वतःच्या बळावर करणे होय .स्वावलंबनाने एकप्रकारचा आत्मविश्वास येतो . मग आपण कोणतेही काम सहज करु शकतो.त्यासाठी आपण स्वतःवर अवलंबून असले पाहिजे .
" स्वावलंबन " हे मूल्य आपण आपली मुले लहान असतानाच त्यांच्यात बिंबवली पाहिजेत . यासाठी आपल्या मुलांना सुरवातीला त्यांची स्वतःची छोटी छोटी कामे स्वतःच करायला सांगावी.सुरवातीला ती चुकतील , काही नुकसानही होईल पण ते आपण सोसलं पाहिजे , कारण यातूनच ती मुले शिकणार आहेत.आपण जी काळजी करतो ती आंधळी काळजी असते , तसे करुन आपण आपल्या मुलांना परावलंबी बनवत  असतो हे आपल्या लक्षात येत नाही.

   संसारातसुद्धा अनेक स्त्रिया या आपल्या पतिवर अवलंबून असतात . लहानसहान कामासाठी त्या अडून बसतात.काहीवेळा मग कुणी नसेल तर मग कामं खोळंबली जातात.बाकीच्यांना मग आपला नाकर्तेपणा जाणवतो.मग आपली कुचंबना सुरु होते व मग आपल्यावर दबाव आणला जातो, मग आपण त्यातच पिचत जातो.स्वावलंबनाने जर आपण वागले आपली कामे जर आपणच केली तर आपले एक स्थान निर्माण होते .आपला विचार केला जातो.वागताना विचाराने वागतात.

  शाळेतही आपण विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे जर लिहून द्यायला लागलो तर मुले स्वतः अभ्यासच करणार नाहीत .व आयत्या उत्तराच्या प्रतिक्षेत स्वतः प्रयत्न करणार नाहीत .परिणामी वार्षिक परीक्षेत त्यांना अडचण येऊ शकते.त्यांना स्वतः उत्तरे शोधायला शिकवा म्हणजे ती अभ्यासात परिपूर्ण होतील व स्वावलंबी होतील.

   स्वावलंबन हा अतिशय आवश्यक असा गुण आहे.जो आपल्याला या जगात मानाने , सन्मानाने जगायला शिकवतो.आपण कुणाच्या मिंद्यात रहात नाही.परावलंबी म्हणजे मृत व्यक्तीचे लक्षण आहे.जिवंत व्यक्ती नेहमी धडपडत असते.

   मग आपण आपल्या जिवंतपणाची साक्ष देऊया .यासाठी परावलंबीत्व सोडून स्वावलंबी बणूया.

लेखिका

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर.

मेरा लाल

शहीद बेटे की माँ द्वारा की गई कविता प्रतियोगिता के लिए

              मेरा लाल

मेरा बेटा आज मुझे
बहुत याद आता है |
सोचकर उसके बारे में
हृदय मेरा भर आता है |

भारतमाता की सेवा में
जान तुने अपनी गँवाई है |
अभिमान है मुझे तुझपर
जान तेरी देश के काम आई है |

गर्व से सदा मैं अब
तेरी ही बातें करती हुँ |
तानके सिना मैं सबसे
गौरवगाथा तेरी गाती हुँ |

मेरा लाल तू अमर रहे
कदम पे तेरे चलेगा भाई |
नही डरेगा वो मरनेसे
याद सदा उसे तेरी आई |

कोख मेरी सफल हुई अब
भारतमाता की सेवा में |
आज लौट के वापस लाल
आँखे बिछाई है तेरी राहोंमें|

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

गर्व नसावा एवढा

काव्यस्पर्धेसाठी

विषय - गर्व नसावा एवढा

आयुष्यात या जगताना ,
गर्व नसावा कधी एवढा .
अहंभाव सोडून जगा ,
मान मिळेल मग केवढा.

गर्वाचे घर नेहमी खालीच ,
असते हे खरे आहे.
निस्वार्थ भावना नेहमी ,
येते कामाला सत्य आहे.

निगर्वी वेत्ती आपली ,
असावी नेहमी सोबतीला.
जोडली जातात माणसे ,
प्रेमाणे आपल्या साथीला.

प्रेम आपुलकी सहानुभूती ,
असावी आपल्या हृदयी.
पाझर फोडेल नक्कीच ,
हृदयी त्या निर्दयी .

हसत असावे फुलापरी ,
फुलवा जीवन दुस-याचे.
सुगंधाने आपल्या कर्तृत्वाच्या ,
जीवन घडवा सर्वांचे .

सुंदर आहेआयुष्य आपले,
आणखी सुंदर करुया .
गर्व सोडून जीवनामध्ये,
आनंदाने जगी राहुया .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

साधना ( दर्पण )

Darपण

साधना

साधना
अविरत करण्याची
साधना
ध्येयप्राप्तीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांची
साधना
मनापासून केलेली भगवंताच्या भेटीची भावनायुक्त प्रार्थनेची
साधना
ज्ञान प्राप्तीसाठी यशासाठी विद्यार्थ्यांनी केलेली पराकाष्ठा ती प्रयत्नांची
साधना
संसार यशस्वी होण्यासाठी पती पत्नी दोघांनी केलेली प्रेमाची एकमेकांच्या सहवासाची .
साधना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

आकाश धरती सागर ( हायकू )

स्पर्धेसाठी

            हायकू

आकाश , धरती , सागर

निळे आकाश
आनंद देते मना
स्वच्छ प्रकाश

छान धरती
हिरवीगार ती झाडे
मनात प्रिती

शांत सागर
ओढ जीवाला लावी
प्रेम आगर

अशा पर्यावरणाचे
रक्षण करु आपण
करु स्वसंरक्षण

निसर्ग जीवनदायक
सखा आपला आहे
नेहमी प्रेरणादायक

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

भारताची राज्यघटना

स्पर्धेसाठी

विषय -- संविधान दिन

      भारताची राज्यघटना

सर्वोच्च कायदा भारताचा ,
घातला स्वशासनाचा पाया.
अध्यक्ष बाबासाहेब झाले ,
तयार मनूस्मृती गाडाया .

राज्यघटना भारताची खास,
कायदेशीर बाबी त्यात .
शिल्पकार ठरले ते महान,
आचरणाने उतरवले सत्यात

सम्मान संविधानाचा जगी,
मिरवतो झेंडा त्याचा मानाने
उदारमतवादी तत्वांचा मेळ,
घालून मिरवतो अभिमानाने.

सार्वभौम समाजवादी ही ,
धर्मनिरपेक्ष असे लोकशाही.
आचार विचारांचे स्वातंत्र्य ,
नाकारुन सवर्णांची दंडुकशाही .

झाली सुटका आपली आता,
मनूस्मृतीच्या विळख्यातून .
स्वातंत्र्य समता बंधुता ,
प्राप्त झाली प्रयत्नांतून .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

बलिदान

स्पर्धेसाठी

       विषय -- बलिदान

पेटली मशाल ती धगधगत
बलिदान तुमचे व्यर्थ न गेले
प्रेरणाज्योती जाग्या झाल्या मनात
देशप्रेमी हौतात्म्याला पुढे आले.

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Friday, 24 November 2017

मन ( मन )

DaRपण

मन

मन
खूपच सुंदर
मन
धावत असते सगळीकडे निरंतर
मन
उद्याच्या आशेने देते मानवाला उभारी खरोखर
मन
निराशेत उदास होते व धावत असते ते घरभर
मन
सकारात्मकता दाखवते नेहमी जरी दाखवली त्याने नकारात्मकता व ऊदासीनता  वरवर.

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर.

माझा काय गुन्हा

स्पर्धेसाठी

      चित्रकाव्य

      माझा काय गुन्हा ?

सांग ना आई मला ,
माझा काय आहे गुन्हा ?
बांधून ठेवलं तू मला ,
नको करु अस पुन्हा .

मोबाईल मध्येच आहेस ,
केव्हापासून एकदम गुंग .
बाटली दुधाची रिकामी ,
उडून गेलाय माझा रंग .

झोपाळ्यात बसुन तू ,
निवांत झाली आहेस .
माझं खेळणं मात्र आता ,
बंद तूच केल आहेस .

कितीवेळ अस हे चालायच?
बंदिस्त जीवन नको मला .
सोड तो मोबाईल पहिला ,
मांडीवर घेऊन खेळव मला.

नको जाऊ आहारी बाई , कृत्रीम भावनाहिन यंत्रांच्या
भविष्यातील आधार तुझे ,
आहेत तुलाच घडवायच्या.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Thursday, 23 November 2017

पायवाट ( दर्पण )

DaRपण

पायवाट

पायवाट
गवताने भरलेली
पायवाट
रोज पायाखाली सर्वांनी तुडवलेली
पायवाट
पांथस्तांना लांबचा रस्ता जवळ करुन दाखवलेली
पायवाट
सकाळ संध्याकाळ रोज सर्वाँनी मिळून तुडवून मोठी केलेली
पायवाट
मानवाबरोबर जनावरांसाठीही उपयोगी ठरणारी आपलेपणाची सहकार्याची भावना अलगद मनात जोपासलेली
पायवाट

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

पहिला प्रेमभंग ( काव्यांजली )

स्पर्धेसाठी

         काव्यांजली

  विषय - पहिला प्रेमभंग

पहिला प्रेमभंग
असा कसा झाला
विरह आला
मनात

पहिला प्रेमभंग
वाईट वाटले मनाला
समजावू कुणाला
विनाकारण

पहिला प्रेमभंग
आठवत राहतो सदैव
हेच दुर्दैव
जीवनात

पहिला प्रेमभंग
मनाला दुःख देतो
रोज मरतो
घडीघडीला

पहिला प्रेमभंग
नकोच कुणाला व्हायला
आनंदी रहायला
जमवायच

     कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530

कन्यारत्न

आजचा उपक्रम

   चारोळी

विषय -- कन्यारत्न

कन्यारत्न आहे ज्याचे घरी
असे तोच खरा भाग्यवान
कन्यादानाचे पुण्य पदरी
नाही जगी दुजा पुण्यवान

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड .

चांदणे ( दर्पण )

दर्पण

चांदणे

चांदणे
गगनाची शोभा
चांदणे
रात्रीच्या अंधारातील सौंदर्याची आभा
चांदणे
चंद्राची शोभा वाढवणारे आकाशगंगेतील टिपूर प्रभा
चांदणे
काळोख्या रात्री भरलेली गगनातील तारकांची सुंदर मोहक सभा
चांदणे
अनाथ मुलांच्या जीवनातील एक प्रेमळ आधार वाटणारी शांती देणारी प्रतिभा
चांदणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

नाते

स्पर्धेसाठी

शब्दचारोळी

विषय -- नाते

नाते असावे आकाशापरी
सर्वांना कवेत घेण्यासाठी
क्षितीजावर सुखदुःखाच्या
खरे सहाय्य करण्यासाठी .

      रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Wednesday, 22 November 2017

आम्हालाही हवाय मोबाईल

उपक्रम
चारोळी

आम्हालाही हवाय मोबाईल

आधुनिकतेची कास धरुन
तंत्रस्नेही आम्हाला व्हायचय
आम्हालाही हवाय मोबाईल
अटकेपार झेंडा रोवायचाय

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

दर्पण कटाक्ष

दर्पण
कटाक्ष

कटाक्ष
माझ्या नजरेचा
कटाक्ष
चुकल्यावर समजावण्यासाठी तो रागाचा
कटाक्ष
गौरवपूर्ण कार्य केल्यावर अभिमानाने टाकलेला प्रेमाचा
कटाक्ष
मनाविरुद्ध काम झाल्यावर रागाने टाकलेला तो कटाक्ष तिरस्काराचा
कटाक्ष
यश मिळाल्यावर गुरुने आपल्या शिष्याकडे टाकलेला एक अर्थपूर्ण असा अभिमानाचा .
कटाक्ष

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Tuesday, 21 November 2017

प्राक्तन

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

मळकटलेल्या नशीबाला
दोष देऊ की या जीवनाला
एकमेकांचा आधार होऊ
उपाय काय या प्राक्तनाला ?

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Sunday, 19 November 2017

हायकू डोंगर दरी

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - डोंगर दरी

डोंगर दरी
आनंद दाटे ऊरी
हो खरोखरी

उंच डोंगर
ती खोल खोल दरी
देखावा भारी

आनंदी मन
झाले आज बेभान
निसर्ग छान

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर

Saturday, 18 November 2017

संघर्ष

स्पर्धेसाठी

आठोळी

संघर्ष

विनासायास न मिळे काही
संघर्षाला पर्याय हो नाही .
प्रयत्नाविना मिळाले काही
किंमत त्याची काहीच नाही

प्रयत्न , संघर्ष सोबतीला
यश हातात धरेल हात
परावलंबी जीवनामध्ये
स्वावलंबनाने करा मात .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

कोण आहे माझं ?

स्पर्धेसाठी

    कोण आहे माझ ?

जो तो येथे फक्त ,
आपलाच विचार करतो .
कोण आहे माझं इथे ?
प्रश्न मनाला छळतो आहे .

कोण आहे माझं पेक्षा ,
मी कुणाची आहे ?
हाच प्रश्न महत्वाचा ,
मला वाटतो आहे .

परोपकारी वृत्तीने आता ,
वागू सगळ्यांबरोबर .
नाती तयार होतील ,
आपोआप आपल्याबरोबर .

प्रयत्न केला खूप जेव्हा ,
नाती आपोआप बिलगली.
मनाच्या या कोंदनात ,
अलगद ती विसावली .

सांभाळू या नात्यांना ,
अहंभाव ठेवून बाजूला .
प्रेमभावे आदराने मग ,
नातीच येतील संगतीला .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

नागरिकांची कर्तव्ये

स्पर्धेसाठी

जागतिक नागरिक दिनानिमीत्त काव्यस्पर्धा

नागरिकांची कर्तव्ये

भारताचे आम्ही रहिवासी ,
अभिमान याचा आम्हाला.
उन्नतीसाठी याच्या नेहमी,
प्रयन्तांची ग्वाही हो तुम्हाला

कर्तव्याप्रती होऊ जागरुक ,
कर्तव्ये समजाऊन घेऊ .
संविधानाचे करुन पालन ,
दुस-यांनाही सांगत जाऊ.

राष्ट्रीयतेच्या आदर्शांना ,
सतत मानवंदना देवू .
भारताच्या अखंडत्वासाठी
प्राणाचीही बाजी लावू .

रक्षण देशाचे करणे ,
प्रथम कर्तव्य आपल्यासाठी
बंधुभावाची भावना मनी ,
गौरवशाली संस्कृतीसाठी .

करू मातापित्यांचे रक्षण ,
कर्तव्य आपले महान आहे.
देशहीताबरोबरच आपल्या,
भावी पिढीला घडवायचे आहे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Thursday, 16 November 2017

आयुष्य एक चित्रपट

स्पर्धेसाठी

      शब्दचारोळी

आयुष्य एक चित्रपट

बालपण तारुण्य म्हातारपण
आयुष्य एक चित्रपट असतो
सत्य मानवता परोपकारीता
असेल तरच तो यशस्वी होतो .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
9881862530 .

Tuesday, 14 November 2017

बाळ

स्पर्धेसाठी

बालकविता

    बाळ

एकदा एक बाळ ,
खूपच चिडलं .
मोठमोठ्याने मग ते ,
खूप रडू लागलं .

घरची मंडळी सगळे,
घाबरुनच गेले .
सर्वजण मग त्याला ,
बारीबारी फीरवू लागले .

सगळ्यांचीच आता पहा ,
ऊडाली घाबरगुंडी .
एकएक करत काढून,
टाकली बाळाची बंडी .

बघून सगळ्यांच्या या ,
सुंदर छान कवायती .
बाळाला वाटल्या त्या ,
मजेशीर गमतीजमती .

डुलवलं , जोजवलं ,
पाळण्यात घालून हलवलं .
मग कुठे ते छोटसं बाळ ,
शांत निवांत झोपी गेलं .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

सुंदर खेळ

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

निरागस बालपणीचा तो
सुंदर खेळ पहा फुग्यांचा
रंगून गेली माता मुलगी
विसरुन बंध तो वयाचा.

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Sunday, 12 November 2017

मराठी मातृभाषेचे महत्व

लेखस्पर्धा

विषय -- मराठी मातृभाषेचे महत्व

मातृभाषा म्हणजे आपल्या घरात आपले आईवडील परंपरेने जी भाषा बोलत आले आहेत ती भाषा होय .मराठी मातृभाषा असणारे व बोलणारे त्यात व्यवहार करणारे लोक भरपूर आहेत.त्यांची ती मातृभाषा असते .

जन्माला आल्यापासूनच मूल आपल्या आई-वडीलांच्यासारखेच ऐकून बोलायला शिकते.त्याला ती सहजसाध्य होते.मातृभाषेमधुन घेतलेले ज्ञान मुलांना फार लवकर समजते.

" मराठी असे अमुची मायबोली जरी ती राज्यभाषा नसे " असे कवि यशवंत म्हणतात यावरुनच मराठी भाषेचे महत्व लक्षात येते.मराठीत पहिली काव्यरचना ज्ञानेश्वरांनी केली व ज्ञानेश्वरीचा गोडवा व माधुर्य सा-या जगाला चाखायला दिला .संतानी मराठी भाषेला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करुन दिला .

मोगलकाळातही शिवाजी महाराजांनी आपला रयतेचा सारा कारभार मराठीतूनच ठेवला होता .स्वातंत्रवीरांनी मराठी भाषा ईंग्रजांच्या राजवटीत सुद्धा व्यवहारासाठी चालू ठेवली . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी महाराष्ट्राची भाषा झाली.

आज मराठीला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून ओळखली जाते.मराठी भाषा ही लवचिक असल्यामुळे प्रदेशानूसार ती बदलत जाते .दर बारा कोसावर , पंचविस कीलोमीटरवर बदलते.तिचा हेल बदलतो.कोकणी,घाटी,व-हाडी ई.अनेक प्रकारे ती ओळखली जाते.

मराठी भाषा बोलणा-या लोकांची संख्या पाहता मराठी भाषेचा जगात पंधरावा व भारतात चौथा क्रमांक लागतो.मराठी भाषा ईसवीसन ९०० पासून प्रचलित आहे.९ करोड लोकं ही भाषा बोलतात.देवनागरी ही मराठीची लिपी म्हणून ओळखली जाते.मराठीत साहित्यही भरपूर आहे.त्याचा ऊपयोग आपण करुन घेतला पाहिजे.

आज आपण पाहतो मराठी माध्यमांपेक्षा ईंग्रजी माध्यमाच्या शाळेंकडे लोकांचा ओढा जास्त दिसत आहे.त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे.ईंग्रजी माध्यमातील मुले मराठीचा उच्चार योग्यरीतीने करत नाहीत व मराठीचा बाज निघून जातो.त्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम वाटत नाही.

त्यामुळे आपणच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहीजे .आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात मराठीचाच जास्त वापर केला पाहिजे.

चला तर मग लागूया मराठीच्या विकासाच्या व समृद्धीच्या कामाला.
धन्यवाद

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाडता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

नकळत जाते राहून काही

स्पर्धेसाठी

चारोळ्या

नकळत जाते राहून काही

              1

सांगायचे असते खूप काही
मनाला रिते करायचे असते
नकळत जाते राहून काही
भावनांची तडफड राहते.

       2

शब्द शब्द जुळवून एकत्र
व्यक्त होण्या अधीर मन होते
नकळत जाते राहून काही
तगमग जीवाची शांत न होते.

          3

नकळत जाते राहून काही
जरी व्यक्त झाल्या भावना
अवचीत समोर येता कोणी
जाग्या होतात मनीच्या कामना.

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

बहिणीची माया

स्पर्धेसाठी

चारोळी

बहिणीची माया

प्रेमाचा आसतो तो निखळ झरा
धरी आपल्यावर आईची छाया
जगी नाही तोड तिच्या या स्नेहाला
धन्य ज्याला मीळे बहिणीची माया .

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Saturday, 11 November 2017

मेंदी (दर्पण )

दर्पण
मेंदी

मेंदी
स्त्रीच्या जिव्हाळ्याची
मेंदी
हातावर नाजूक नक्षिने भरण्याची
मेंदी
मनातील भावनांच्या रेषा कोरुन कोरुन काढण्याची
मेंदी
पानाफुलांनी सजलेली व निसर्गदृश्यांनी भरलेली  अलवार खास प्रेमदृश्यांची
मेंदी
मंगल प्रसंगाची आठवण करुन देणारी , डोळ्यातील आनंद सहज दाखवणारी प्रितीची
मेंदी

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

स्वप्न ( दर्पण )

दर्पण

स्वप्न

स्वप्न
मी पाहीलेलं
स्वप्न
सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलेलं
स्वप्न
त्यासाठी प्रयत्नांची खूप पराकाष्ठा करावं लागलेलं
स्वप्न
न डगमगता ते पूर्ण होईपर्यंत अविरत पाठपुरावा केलेलं
स्वप्न
सत्यात उतरल्यानंतर मनाचा आनंद गगनभरारी घेत श्रमसाफल्याचा हार गळ्यात मिरवलेलं
स्वप्न

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Friday, 10 November 2017

काष्ठशिल्प

स्पर्धेसाठी

     चित्रकाव्य

       काष्ठशिल्प

काष्ठशिल्प म्हणू की चित्र
अंदाज मी बांधत आहे .
कयासांच्या मेळ्यामध्ये ,
मन गोंधळून गेले आहे .

वाटते जसे की वृक्षाच्या ,
फांदीवर अवतरली ललना.
जणू सूर छेडते एकांतात ,
ओढ सख्याची तिच्या मना.

शांत निवांत प्रहरी ,
अलगुज सूर काढती .
वेलींच्या त्या वेढ्याने ,
काया ललनेची भासते .

निष्पर्ण रुक्ष काष्ठ ते ,
सुंदर आकार सुखावते .
भासे जणू घेऊन बासरी ,
अलवार ती वाजवते .

निसर्ग देतो प्रेमळ संदेश ,
प्रेम करावे सर्वांवर .
कुरुप जरी असला वृक्ष ,
प्रेम मात्र करतात शिल्पावर.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

न्यायव्यवस्था

लेखणी प्रहार समूह आयोजित चारोळी स्पर्धा

विषय -- न्यायव्यवस्था

उडालाय विश्वास सर्वांचा
अशी आमची न्यायव्यवस्था
न्यायदेवता अबोल , अंध
का दयनीय तिची अवस्था ?

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Thursday, 9 November 2017

दर्पण थंडी

दर्पण
थंडी

थंडी
गुलाबी बोचरी
थंडी
शरीरात खूप गारठा जाणवणारी
थंडी
हवीहवीशी पण शरीरात ऊब निर्माण करणारी
थंडी
हुडहुडी भरल्यामुळे शेकण्यासाठी शेकोटीची सतत आठवण करुन देणारी
थंडी
गुलाबी भासणारी व असणारी रोज मऊ स्वेटर घालायला भाग पाडणारी
थंडी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Wednesday, 8 November 2017

आशय आयुष्याचा

स्पर्धेसाठी

     शब्दचारोळी

  आशय आयुष्याचा

समजून घ्यायला हवाय
आशय आपल्या आयुष्याचा
कर्तृत्व , मानवतेने उभा
कळस व पाया जीवनाचा .

      रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Tuesday, 7 November 2017

लेख -- शिक्षणाचे महत्व

क्रांतीची फुले समुहातर्फे

      लेख स्पर्धा

विषय -- शिक्षणाचे महत्व

जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला योग्य अयोग्य याचा सारासार विचार करताआला पाहिजे. मनाचा निग्रह महत्वाचा आहे . पण हे सर्व शिक्षणाने सहज साध्य होते .शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता नव्हे.
       लिहायला वाचायला आले तर तो व्यक्ती साक्षर होईल , पण संस्कारी होईल की नाही हे सांगता येणार नाही.त्यासाठी चांगले , कसदार ,प्रभावी वाचन होणे गरजेचे आहे .शिक्षणाने हे सर्व सहज शक्य आहे .

      शिक्षणाची आवड मनापासून असली पाहिजे. तरच कीतीही अडचणी आल्या तरी त्या पार करुन लिलया त्यातून बाहेर पडता येते . शिक्षणाने मनाची मशागत होते.संस्कारक्षम मन बनते व आपल्या आचरणाने समाजात ती व्यक्ती आदरणीय बनते .

   सर्व थोर व्यक्ती शिक्षणामुळेच महान होऊ शकल्या .मग ते शिक्षण घरचे असूदे नाहीतर शाळेतील असूदे.शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण घेणे व त्यात पारंगत होणे नव्हे तर त्या शिक्षणाचा व्यवहार ज्ञानात कीती ऊपयोग करुन घेतो कींवा ते ज्ञान कीती ऊपयोगी पडते हे महत्वाचे आहे .शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रीया आहे.

    शिक्षकांच्या पैशावर ठेऊन त्यांना नांवे ठेवणे चुकीचे आहे.चला तर मग आपण शिकूया , शिकवूया , शिकायला मदत करुया.

  धन्यवाद .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .