Sunday, 8 July 2018

कविता ( गवाक्ष )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

गवाक्ष

जुन्यापुराण्या भिंतीपलीकडे,
जेव्हा मी पाहिले गवाक्षातून.
दृश्य जे दिसले नजरेसमोर,
टचकन आले पाणी डोळ्यातून.

विस्तीर्ण पसरला सागरराजा,
पोटात ठेवलेत रहस्य दडवून.
ईमारतींच्या गर्दीतून पाहता,
जातय मन सहजच दडपून.

प्लास्टिक मुक्तीचा नारा
सागरालाही द्यावा लागेल.
श्वास घेण्यासाठी मोकळी जागा,
त्यालाही आता शोधावी लागेल.

सूर्याची लालसर प्रभा,
पसरलीय छान आकाशात.
कचऱ्याचा ढीग साठलाय,
या अथांग अशा सागरात.

गवाक्ष नाही दाखवत खोटे,
याच देही याची डोळा ,
भोगतोय मानव चुक आपली,
आतातरी प्लॅस्टिक तुम्ही टाळा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कोल्हापूर.

No comments:

Post a Comment