Wednesday, 4 July 2018

सहाक्षरी कविता( कसे सांगू तुला )

स्पर्धेसाठी

सहाक्षरी

विषय-- कसे सांगू तुला

कसे सांगू तुला,
आशा मनातल्या.
बेधुंद झाल्यात,
वाटा वाणीतल्या

आज दिवस हा
खास माझ्यासाठी.
मनमयुर हा ,
नाचे कोणासाठी.

औक्षण करण्या ,
निरांजने करी .
कुंकुत तिलक
शोभे  भालावर .

कसे सांगू तुला ,
भाव मनातला ,
सलज्ज भावना
शोभे कुटुंबाला.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड 
ता. शिरोळ, जिल्हा- कोल्हापूर

No comments:

Post a Comment