Sunday, 8 July 2018

कवितेस पत्र

स्पर्धेसाठी

कवितेस पत्र

प्रिय कविता,

आता पत्रास कारण की मला ना तुला पत्र लिहायला सांगीतले आहे. त्यामुळे मी वेळात वेळ काढून हे पत्र लीहीत आहे. कशी आहेस ? छानच असणार .हो ना ?

तूला माहिती आहे का की तूझ्या मैत्रीमुळे कीतीजणांना तू आनंदी केलयस ? कविते तू आहेस म्हणून तर आम्ही साहित्यिक आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. आनंदी राहतो दुसऱ्यांनाही आनंदी करतो. खरोखरच मनातील भावना बाहेर येण्यासाठी कीती धडपडत असतात म्हणून सांगू तूला.सर्वांना हे शक्य नाही गं.पण ज्यांना ज्यांना तू भेटलीस ना त्यांना त्यांना तू खूप समाधान दिलेस. कारण तूझ्या मैत्रीमुळे ते सर्वजण व्यक्त होऊ शकले.

तूला आठवतयं का आपली मैत्री कशी झाली ती ? आठवलं ना ? मी महाविद्यालयात होते.प्रोफसरांनी मासिकासाठी लिहायला सांगितले होते. मीपण म्हटलं चला आपण एक कविता लिहू.विषय घेतला माझी शाळा.मग काय लागले शब्द आठवायला . आणि हळूहळू शब्द सुचत गेले व तू तयार झालीस.मी तूला वाचायला माझ्या मैत्रीणीला दिली.तीने तूला वाचले व म्हणाली छान झालीय कविता. कविते तूला सांगते मी खूप आनंदी झाले गं तेव्हा.तेव्हापासून आपली मैत्री कायम आहे.

आज तूझ्यामुळेच मला कवयित्री होण्याचा मान मिळालाय.तू आता माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहेस.तूला सांगते कविते तुझ्याबरोबर माझा वेळ कसा आणि कुठे जातो कळतच नाही बघ.तूला वाचण्यासाठी मी तूला घेऊन परगावी जाते व तिथे वाहवा मिळवते ना तेव्हा खूप बरं वाटतं.ऑनलाईन कीतीतरी कवितावाचन, काव्यलेखन स्पर्धमध्ये मी भाग घेते.आपली मैत्री चांगली असल्यामुळे माझी कविता सर्वांना आवडते.मला प्रमाणपत्रे मिळतात.मला खूप छान वाटते. समधान वाटते मला.तू माझी शब्दमय मैत्रीण आहेह. तूझी मैत्री खूप काळपर्यंत टीकवायची आहे. माझ्या मनातील भावना दुखावल्या वा सुखावल्या तर तूच माझी संगीनी असणार आहेस माझी समजूत घालायला व आनंदात सहभागी व्हायला.

आपण आपली मैत्री माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवू.हे माझे वचन आहे तूला.तू मला सोडणार नाहीस हा माझा ठाम विश्वास आहे.सतत माझ्या मनातील कल्पनेला प्रोत्साहन देणाऱ्या कविते हे पत्र वाचून मला अभिप्राय नक्की दे.

तूझ्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे.

कळावे. लोभ असावा.

तुझीच
माणिक

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment