Sunday, 15 July 2018

कविता ( सकाळ )

झटपट काव्यस्पर्धेसाठी

विषय -- सकाळ

रवीकिरणांची चाहूल लागली,
प्राचीवर लालिमा पसरली .
पहाटवारा वाहू लागला ,
जागृत जनता होऊ लागली.

भूपाळीचे सूर ऐकताना ,
मनमंदीरात जाग ती आली.
सूर्याच्या साक्षीने सारी ,
लगबग कामाची सुरु झाली .

पक्षी कलरव कानी आला,
प्राणी चरण्या बाहेर आली.
जपून सावधपणे इकडेतिकडे
क्षुधापूर्तीसाठी बाहेर पडली.

जनताजनार्दन उत्साहाने,
बेगमी पोटाची करु लागली.
ललना आपल्या कामासाठी,
सडा संमार्जन करु लागली.

सकाळ झाली आभा पसरली,
नवतेजाने ऊजळू लागली.
तेज , आशांचे मनी जनांच्या,
नवज्योत पेटू लागली .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment