स्पर्धेसाठी
विषय - पाऊस ती आणि तो
पाहून पावसाला ,
विरहगीत प्रकटले .
तीच्या आठवणीत ,
त्याचे भान हरपले .
जसा पाऊस मुसळधार,
तसा आठवणींचा पूर .
विरहाग्नीत जळताना ,
त्याला सापडला सूर .
मेघ आकाशी पाहताना,
सय प्रियेची खूप आली.
दिला धाडून संदेश ,
सर घेऊन खाली गेली.
तीने जाणला निरोप ,
वाही आसवांच्या धारा.
भेटण्या मन अधीर ,
ना त्याला अंत न थारा.
पाऊस आला भूवरी ,
तो आणि ती साठी .
केले बहाणे अनेक ,
सुरु झाल्या भेटीगाठी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment