स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
जिद्द
फुलायचयं या जगी ,
ऊमलायचयं मला .
आली जरी संकटे अनेक ,
जिद्द दाखवायचीय जगाला.
जिद्दीने वर यायचयं मला ,
संघर्षाच्या या दुनियेतून .
फोडून जमीन यायचयं वर,
बाजूला व्हायचयं चाकोरीतून.
अडथळे संकटांचे कीतीही येवोत,
अलगद ऊचलून टाकायचयं .
नाही अवघड काहीच येथे ,
जगाला साऱ्या दाखवायचयं
कोमल अंग जरी माझे ,
शिरावर ओझे पेलले मी .
जिद्द पाहून माझी आज ,
दुभंगला रस्ता जिंकले मी.
संघर्षाच्या वाटेवर ,
यशाची आहेत फुले .
जीवनाच्या प्रांगणात ,
सुख दु:ख एकत्र झुले .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment