काव्यप्रज्ञांजली आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेसाठी
फेरी क्रमांक -- ०५
विषय - अष्टाक्षरी
शिर्षक - ओलेचिंब झाले रान
आल्या पावसाच्या धारा,
झाली ओलीचिंब धरा .
ओलेचिंब झाले रान ,
झोंबतोय गार वारा .
पांघरली धरतीने ,
पहा हिरवी दुलई .
सुखावले आता डोळे,
मऊशार ती रजई .
पाने,फुले,फळे आता,
हसू बागडू लागली .
निसर्गाच्या कुशीमध्ये,
नाचू गाऊन डुलली .
रान झाले ओलेचिंब ,
आसमंत गार झाला .
शहारले सारे अंग ,
ऊब शोधाया लागला.
शेतकरी झाला खूष ,
आबादानी झाली खूप .
समाधानी कायमचा ,
राहो सुखी आपोआप .
कोड क्रमांक DPASG 1196
No comments:
Post a Comment