Tuesday, 31 July 2018

अष्टाक्षरी कविता ( बळी पिकवतो मोती )

अष्टाक्षरी स्पर्धेसाठी

विषय - बळी पिकवतो मोती

शेतकरी भाऊ माझा ,
देशासाठी राबतोय .
मरमर कष्टूनही  ,
ऊपाशीच झोपतोय.

दया कधी कुणा यावी,
कष्टताना शिवारात .
बळी पिकवतो मोती ,
माती येते पदरात .

घाम गाळतो शेतात ,
तेंव्हा पिकतात मोती .
अंग लकाके घामाने ,
तेंव्हा धान्य येते हाती .

दाम कामाचे देऊया ,
कष्ट त्याचे खूप झाले .
घरीदारी दैन्य त्याच्या ,
कधी नाही ध्यानी आले .

करु कष्टाची हो पूजा ,
मान पोशिंद्याला देऊ .
दोघे मिळून राबूया ,
शांती त्याच्या जिवा देऊ .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

No comments:

Post a Comment