स्पर्धेसाठी
कविता - एकांत आणि आठवणी
गजबजलेल्या या दुनियेत,
घुमत राहतो आवाजांचा मेळा.
हरवून जातात नकळतपणे ,
नाती करावी लागतात गोळा.
यांत्रिकीकरण आधुनिकीकरण,
नावाच्या गोंडस नावाखाली .
जो तो आज हरवत चाललाय,
निघून गेलीय तोंडावरची लाली .
ताणतणावाचे रोजच प्रसंग,
समाधान काही मिळत नाही .
एकांत हवा आठवणीसाठी .
विसरून जाऊ सर्व काही .
एकांतात मिळते आत्मशांती ,
आठवणी सुखावती मनाला .
कर्म जसे करु तसे मिळते फळ,
माहीत आहे साऱ्या जगाला .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment