स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
आयुष्य
आयुष्य बाळाचे घडविण्यासाठी
दगड तू घडवते आहेस माते
बस आरामदायी ऊभी शेजारी
छीन्नी हातोडा कौशल्याने चालवते
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
आयुष्य
आयुष्य बाळाचे घडविण्यासाठी
दगड तू घडवते आहेस माते
बस आरामदायी ऊभी शेजारी
छीन्नी हातोडा कौशल्याने चालवते
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
अष्टाक्षरी स्पर्धेसाठी
विषय - बळी पिकवतो मोती
शेतकरी भाऊ माझा ,
देशासाठी राबतोय .
मरमर कष्टूनही ,
ऊपाशीच झोपतोय.
दया कधी कुणा यावी,
कष्टताना शिवारात .
बळी पिकवतो मोती ,
माती येते पदरात .
घाम गाळतो शेतात ,
तेंव्हा पिकतात मोती .
अंग लकाके घामाने ,
तेंव्हा धान्य येते हाती .
दाम कामाचे देऊया ,
कष्ट त्याचे खूप झाले .
घरीदारी दैन्य त्याच्या ,
कधी नाही ध्यानी आले .
करु कष्टाची हो पूजा ,
मान पोशिंद्याला देऊ .
दोघे मिळून राबूया ,
शांती त्याच्या जिवा देऊ .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
षटकोळी
गजाननाची कृपा
गजाननाची कृपा झाली
उत्साह अंगी आला
सकारात्मक वीचार झाले
नाराजी दूर पळाली
पाहून वातावरण सगळे
आनंदाला भरते आले
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक--६
विषय- स्री वेदना / संघर्ष
शिर्षक - संघर्ष देवता
बालपणीच सुरवात झाली,
दुटप्पीपनाच्या वागणूकीची.
सतत सोसला कमीपणा ,
सल बोचते मुलगी झाल्याची.
तरुणपणाची कथाच वेगळी ,
बाहेर पडण्या सतत घाबरते .
पदोपदी दबा धरून बसलेल्या,
वासनांध लांडग्यांना सापडते .
संसार गाडा चालवताना ,
अविरत नारी राबत असते .
घरकामाला कमी लेखून ,
बिनकामाची समजली जाते .
म्हातारपणाची कथाच वेगळी ,
अस्तित्व तिचे शोधत असते .
आपल्यातच असतात सारे दंग.
संघर्ष देवता अबोल असते .
संघर्षाच्या या दुनियेत ,
अस्तित्व मात्र टिकवून आहे .
तीच्याशिवाय सर्वांचेच ,
आयुष्य कवडीमोल आहे .
कोड क्रमांक 1196
षटकोळी
चंचल अस्थिर दुनियेत
हवा असतो सर्वांना
आधार या जीवनाचा
भरवसा नाही कुणाचा
कधी काय होईल
सांगता नाही यायचा
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
झटपट षटकोळी
विषय - प्रतिस्पर्धी
प्रतिस्पर्धी असावेत जीवनी
ध्येय स्वतःचे गाठण्यासाठी
पाठीमागे टाकण्या दुसऱ्याला
यश सहज साधण्यासाठी पोहचण्या ईप्सित साध्यापर्यंत
प्रयत्न असावेत सोबतीला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
चित्रषटकोळी
जलविहार
मनसोक्त डुंबती पाण्यात
मुक्त चालला जलसोहळा
हिरवाईच्या सुंदर वातावरणात
पागोळ्याही टपटप पडती
शहारुन अंगावर झेलत
बालचमू मनमुराद खेळतात
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
काव्यांजली
गुरु
माझे गुरु
प्रथम आईबाबा जगती
गाऊ महती
कीती
माझा गुरु
आजी माझी प्रेमळ
खूप सोज्वळ
नेहमीच
शिक्षक शाळेतील
जीवनात मार्ग दाखवला
धन्य जाहला
शिष्य
सर्वच गुरु
निसर्गातील सजीव सगळे
अनुभव वेगळे
देती
शिक्षण मिळते
ज्ञान दिले जाते
सर्वच नाते
गुरुपायी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
चारोळी
गुरु
पाया जीवनाचा भक्कम
गुरुवर्यांचीच किमया
लाख संकटे जरी आली
पार होती अशी लिलया
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
षटकोळी
सोनियाचा दिन उगवला
भाग्य उजळले आज
कन्यारत्न जन्मा आले
सोनियाचा दिन उगवला
पणती आहे वंशाची
सन्मान तिचा करुया
मान छकुलीने उंचावला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
भावना
नाही हसले,हसणारही नाही
कदर आहे भावनांची तुझ्या
सुखदु:खाच्या या मेळ्यात
तुझा वेडेपणाच अंतरी माझ्या
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
काव्यांजली
विषय - भास तुझा होताना
अधर हलले
भास तुझा होताना
धार शब्दांना
आली
शब्द प्रकटले
भास तुझा होताना
मनाच्या यातना
मांडल्या
व्यथा बोलल्या
भास तुझा होताना
खूप प्रतारणा
झाली
आठवणी बोचल्या
भास तुझा होताना
दोन जीवांना
सहजच
प्रेमात आज
भास तुझा होताना
प्रीत फुलताना
दोघांची
काव्य स्फुरले
भास तुझा होताना
आनंदाने गाताना
मनाला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर
माणुसकी
आजकालची माणुसकी
कॅमेऱ्यात बंद झाली
मदतीची अपेक्षा नाही
संवेदना गहाण पडली
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
दर्पणकाव्य
मानवता
मानवता
मला दिसली
मानवता
खेळण्यामध्ये गोडी नाही वाटली
मानवता
पोटात भुकेने काहीली खूप खूप झाली
मानवता
माणुसकी, संवेदना, कणव असलेल्या मानवातील देवाला ती जाणवली
मानवता
पोटाची आग संपता अश्रू आभाराचे ओघळले,मानवतेची कींमत नाही केली
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
वैष्णवांचा मेळा विठ्ठला
आला तूझ्या आज दारी
लल्लाटी टिळा,ऊभा जगजेठी
त्रैलोक्याचा राणा,कर कटेवरी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
आषाढी एकादशी निमीत्त
चारोळी स्पर्धेसाठी
विषय - विठुरायावर चारोळी
विठुराया मुख तुझे पाहताना
देहभान हे वैष्णव विसरले
लागले चित्त तुझ्याच पायी आता
अतृप्त मन तृप्त, पावन झाले
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
चित्रचारोळी
गर्भपात
गर्भातच पाय माझे छाटले
कापून तुकडे केले निर्दयपणे
आनंदी मी कुशीत निवांत
पहुडले होते कीती सहजतेने.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळजिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
कविता - एकांत आणि आठवणी
गजबजलेल्या या दुनियेत,
घुमत राहतो आवाजांचा मेळा.
हरवून जातात नकळतपणे ,
नाती करावी लागतात गोळा.
यांत्रिकीकरण आधुनिकीकरण,
नावाच्या गोंडस नावाखाली .
जो तो आज हरवत चाललाय,
निघून गेलीय तोंडावरची लाली .
ताणतणावाचे रोजच प्रसंग,
समाधान काही मिळत नाही .
एकांत हवा आठवणीसाठी .
विसरून जाऊ सर्व काही .
एकांतात मिळते आत्मशांती ,
आठवणी सुखावती मनाला .
कर्म जसे करु तसे मिळते फळ,
माहीत आहे साऱ्या जगाला .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
चित्रचारोळी साठी
दुष्काळाने भंगली धरणी
पोटचा हा गोळा फासावर
निसर्गाच्या कोपाबरोबर
घर उलटलं बापावर
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
प्रेमभंग
षटकोळी
जीवन जगत असताना
सर्वजण प्रेमाचे भुकेले
मिळता होतो आनंद
प्रेमभंग झाल्यावर मग
वेडापीसा होतो विरहाने
आठवतो मग चिदानंद
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
सुप्रभात
प्राचीवरती भास्कर आला
सुप्रभात सुरु जाहली
सूर्यकिरणे पसरु लागली
लालीमा सोनेरी पसरली
नकळत त्याच्या स्पर्शाने
चरचराला जाग आली
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,
उपक्रम
षटकोळी
भाव मनातले
ओळखशील तू कधी
भाव माझ्या मनातले
शब्दाशिवाय व्यक्त होतात
भाषा नजरेची ओळख
न बोलताही ते
सर्व सांगून जातात
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
आठोळी
विरत चाललाय श्वास
रोजच्या जीवनात माझ्या
आठवतो तुझा आभास
आगतीक होऊन आता
विरत चाललाय श्वास
अधीर झालयं मन हे
भेट तुझी गं घेण्यासाठी
विरणाऱ्या श्वासागणिक
आतूर हे जगण्यासाठी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
झटपट काव्यस्पर्धेसाठी
विषय -- सकाळ
रवीकिरणांची चाहूल लागली,
प्राचीवर लालिमा पसरली .
पहाटवारा वाहू लागला ,
जागृत जनता होऊ लागली.
भूपाळीचे सूर ऐकताना ,
मनमंदीरात जाग ती आली.
सूर्याच्या साक्षीने सारी ,
लगबग कामाची सुरु झाली .
पक्षी कलरव कानी आला,
प्राणी चरण्या बाहेर आली.
जपून सावधपणे इकडेतिकडे
क्षुधापूर्तीसाठी बाहेर पडली.
जनताजनार्दन उत्साहाने,
बेगमी पोटाची करु लागली.
ललना आपल्या कामासाठी,
सडा संमार्जन करु लागली.
सकाळ झाली आभा पसरली,
नवतेजाने ऊजळू लागली.
तेज , आशांचे मनी जनांच्या,
नवज्योत पेटू लागली .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
षटकोळी
निरागस जीवन तुझे
यशाकडेच झेपावू दे
आले कीतीही संघर्ष
मनगटी बळ असूदे
ध्येयसीद्धीचा ध्यास घे
सकारात्मकतेनेच होतो ऊत्कर्ष
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
चित्रकाव्य स्पर्धेसाठी
शिर्षक - शिवार
भेटून गार पावसाला ,
नटली हिरवाईने धरती.
आपसूकच जागी झाली,
मनात तिच्या कोमल प्रिती.
रान शिवार बहरले ,
काळी माती ओली झाली.
बीज अंकुरण्या मातीत ,
आनंदाने रुजू लागली .
वर निळे आकाश छान ,
गर्द झाडी दाट खाली .
खेळ ऊन सावलीचा ,
चाले सुंदर नभाखाली.
वारा बांधावरून वाहीला,
झाडे वेली डुलू लागली .
बोल ओठी आपसूकच,
प्रेमगीत स्फुरु लागली.
झाला पोशिंदाही खूष ,
नको अविचार मनी .
कष्ट करुन जोमाने ,
यश फुलवू अंगणी .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
विषय - पाऊस ती आणि तो
पाहून पावसाला ,
विरहगीत प्रकटले .
तीच्या आठवणीत ,
त्याचे भान हरपले .
जसा पाऊस मुसळधार,
तसा आठवणींचा पूर .
विरहाग्नीत जळताना ,
त्याला सापडला सूर .
मेघ आकाशी पाहताना,
सय प्रियेची खूप आली.
दिला धाडून संदेश ,
सर घेऊन खाली गेली.
तीने जाणला निरोप ,
वाही आसवांच्या धारा.
भेटण्या मन अधीर ,
ना त्याला अंत न थारा.
पाऊस आला भूवरी ,
तो आणि ती साठी .
केले बहाणे अनेक ,
सुरु झाल्या भेटीगाठी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
षटकोळी
मातीचा सुवास
तापल्या मातीत पडलं
चार थेंब पावसाचे
आला मातीचा सुवास
धुंद झाले मन
भावना बोलती आता
हवा वाटे सहवास
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा.कोल्हापूर
उपक्रम
आठोळी
पावसातल्या आठवणी
रोमांचीत करुन जातात
पावसातल्या आठवणी
शहारते अंग अंग सारे
टपकते जेंव्हा पाणी
ओलेचिंब झाले सारे
गारठा झोंबे अंगा
नको घेऊ पावसा तू
माझ्यासंगे कधी पंगा
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर
उपक्रम
चारोळी
विषय - पूर
वरुणराजा असा बरसला
नदीला आला महापूर
झरे नाले वाहू लागले
अस्वच्छता गेली दूर .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता. शिरोळ
उपक्रम
आठोळी
घे भरारी
जीवनाच्या यशोशिखरावर
घे अशीच ऊंच भरारी
तमा नको संकटांची बाळगू
पथ पार कर हा मनोहारी
वाट जरी भासे काटेरी
सुगंधी फुलांची भेट तूला
चालत राहणे अथकपणे
मिळेल अंती यशमाला.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
षटकोळी
विषय - शांतता
अशीच असते नेहमी
वादळापूर्वीची ती शांतता
अंदाज कशाचाच नसतो
सर्व काही अलबेल
वाटत असते मनाला
सर्व आभास असतो
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
दर्पण
सैनिक
सैनिक
देशाची शान
सैनिक
ठेवतो देशरक्षणाचे सदैव भान
सैनिक
त्याच्या पराक्रमाच्या गाथा ऐकण्यास आतूर कान
सैनिक
लढतो देशासाठी देऊन बाजी प्राणाची याची असावी जाण
सैनिक
गौरव आहे सर्वांचा शौर्याने लढून नेहमीच वाढवतो ऊंचावतो देशाची मान
सैनिक
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
उपक्रम
शेल चारोळी
वळणावर वळण घेता
घेता सरतो सुंदर घाट
डोंगर दरीच्या कुशीतून
कुशीतून दिसतो निसर्गाचा थाट
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
जनसंख्या दिन
देखकर बढती हुई आबादी,
धरती अपने आप से बोली।
भविष्य मेरा कैसा होगा,
क्या हो जाएगी मेरी होली ?
मानव ने खो दी है मानवता,
कर रहा है वह वृक्षसंहार।
अपनी आबादी के कारण,
कर रहा मुझपर प्रहार।
समज ले ये तू नासमझ ,
शेखचिल्ली तू बन रहा है।
न रोक के ये आबादी तू,
पाँवपर कुल्हाडी मार रहा है।
जाग अभी समय है,
सिमीत कर तू परिवार ।
दोनों रहेंगे खुशहाल यहाँ,
कर ले तू सोच विचार ।
जनसंख्या दिन मनाने की,
नौबत ही नहीं आयेगी ।
सही विचार तेरा तुझे ,
भविष्य तेरा सवाँरेंगी ।
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
9881862530
स्पर्धेसाठी
विषय - वाढती लोकसंख्या
शिर्षक - लोकसंख्या
जननदर वाढत चाललाय ,
मृत्यूदर कमी होत चाललायं
जो तो बोलतोय त्वेषाने ,
लोकसंख्यादर कमी करायचायं .
लोकसंख्या वाढीमध्ये आता
प्रमाणबद्धता ठेवायची आहे
हम दो हमारा एक घोषणा ,
लवकरच येणार आहे .
विस्फोट जनसंख्येचा ,
रोज वाढतचं चाललाय .
बेकारी, गरीबी,समवेतच आहे,
सामान्य यात पिचत चाललाय.
आणायच्या कुठुन सुविधा,
प्रत्येकाला पुरवण्यासाठी.
नियंत्रण ठेवावेच लागेल,
सर्वांच्या विकासासाठी.
नाही वाढू द्यायची लोकसंख्या,
जनजागृती आता करूया .
संपन्न भारताची धुरा नक्की,
हाती आपल्या घेऊन चालूया.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्ह्या.कोल्हापूर
दर्पण
घुसमट
घुसमट
माझ्या मनाची
घुसमट
व्यक्त होण्यास धडपडणाऱ्या वीचारांची
घुसमट
सासुरवाशीण, मनात असूनही न बोलणाऱ्या सुनेची
घुसमट
आई बायको दोघींच्या मध्ये नकळतपणे पिसला जाणाऱ्या नवऱ्याची
घुसमट
शासन आणि प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही असूनही मुस्कटदाबी झेलणाऱ्या जनतेची
घुसमट
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
उपक्रम
आठोळी
गंध मातीचा
वेडावतो मनाला
तो गंध मातीचा
तापलेल्या धरतीवर
शिडकावा पावसाचा
धुंदावते वेडे मन
हुंगुन गंध मातीचा
मोह आवरत नाही
तोंडी तीला लावण्याचा
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
उपक्रम
चारोळी
फिरुन पुन्हा नव्याने
कालचक्र हे चालत राहते
कालचे परत येते आज
फिरून पुन्हा नव्याने
गतकाळाचा लेवून बाज
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
काव्यप्रज्ञांजली आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेसाठी
फेरी क्रमांक -- ०५
विषय - अष्टाक्षरी
शिर्षक - ओलेचिंब झाले रान
आल्या पावसाच्या धारा,
झाली ओलीचिंब धरा .
ओलेचिंब झाले रान ,
झोंबतोय गार वारा .
पांघरली धरतीने ,
पहा हिरवी दुलई .
सुखावले आता डोळे,
मऊशार ती रजई .
पाने,फुले,फळे आता,
हसू बागडू लागली .
निसर्गाच्या कुशीमध्ये,
नाचू गाऊन डुलली .
रान झाले ओलेचिंब ,
आसमंत गार झाला .
शहारले सारे अंग ,
ऊब शोधाया लागला.
शेतकरी झाला खूष ,
आबादानी झाली खूप .
समाधानी कायमचा ,
राहो सुखी आपोआप .
कोड क्रमांक DPASG 1196
दर्पण
शिवार
शिवार
फुलले फुलले
शिवार
सुंदर मोहक फुलांनी बहरले
शिवार
पाहून दृश्य ईथले सर्वजण मनोमन आनंदले
शिवार
निसर्गाचे विलोभनीय हिरवे गारवा देणारे अप्रतिम रुप दिसले
शिवार
विविध फुलांनी फळांनी वनस्पतींनी वृक्षांनी भरलेले व व्यक्तींच्या मनास भुलवलेले
शिवार
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
आराधना
बा विठ्ठला पांडुरंगा
आराधना तुझीच करतो
ओठी तुझेच नांव
भाव मनीचा सादर
तुझ्याच पायी करतो
विस्मृतीत माझा गांव
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
उपक्रम
आठोळी
ओंजळ फुलांची
शुभ्रधवल रंगात रंगूनिया
सुगंधाने न्हाली ओंजळ फुलांची
गंधीत मोगरा फुलून तो आला
हर्षाने ऊघडली दारे मनाची
सणसमारंभ असो की उत्सव
मोगरा हवाच महिलांना खास
ओंजळ फुलांची फीरते सर्वत्र
क्षणात रिती होतेच हमखास
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
लेखणी माझी देखणी प्रथम वर्धापणदिनाच्या निमित्ताने ऑडिओ स्वरूपात गाईलेली कविता
यशपताका
यशपताका गगनी,
उंच उंच जाऊदे .
लेखणी माझी देखणी,
अशी रोज बहरू दे.
प्रथम वर्धापणदिनी ,
पाऊस शुभेच्छांचा.
वर्षाव होत राहो ,
या शब्दसुमनांचा.
.पाऊल हे यशाचे,
पुढे पुढेच जाऊदे.
रोज नीत्यनव्याने,
बदल यात घडू दे.
सागर हा अथांग ,
शब्दांचे माणिकमोती.
विचारांचा हा खजिना,
साहित्य ही संपत्ती.
सामर्थ्य लेखणीचे,
जगा सर्व कळूदे .
देखण्या उपक्रमांचे,
जगी नांव होऊदे.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
दर्पण
विठ्ठल
विठ्ठल
माझा सावळा
विठ्ठल
वारीचा सोहळा आहे आगळा
विठ्ठल
सारे वारकरी भक्तीसाठी याच्या झाले गोळा
विठ्ठल
झाला विठ्ठलमय आसमंत ,पाहून दिंडीचा हा नयनरम्य सोहळा
विठ्ठल
विठ्ठलनामाचा गजर झाला नाद कानी आला सुखावे मनाला भाव वेगळा
विठ्ठल
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
विषय -- गारवा
शिर्षक -- पावसाळा
झाली होती काहिली जीवाची,
तगमग नव्हती सहन होत .
गारव्यासाठी बेचैन सगळे,
जीव होता नुसता तडफडत.
आला पावसाळा एकदाचा,
झाली सुरवात तर चांगली.
उकाडा झाला कमी आता,
ऊष्म्याची झळ ती थांबली.
हवेत आला गारवा हवासा,
समाधानी बैचैन मन झाले.
नकळतपणे चेहऱ्यावर
हास्य आपोआप खुलले.
हिरवीगार हिरवाई छान ,
नक्कीच सगळीकडे दिसेल.
पांग डोळ्याचे फेडताना ,
कष्ट आपोआप हरेल .
राहू दे असाच गारवा ,
जीवन सुसह्य बनू दे .
सुखीसमाधानी बंधुभगिणी
भविष्य भारताचे घडवू दे.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
दर्पण
पुणे
पुणे
नाही ऊणे
पुणे
आहोत आम्ही ईथे पाहुणे
पुणे
चारपाच दिवस वास्तव्य ईथे आहे करणे
पुणे
ईच्छा आहे माझी ईथे येऊन वडापाव ,मिसळ खाणे
पुणे
जाताना सर्वांना निरोप देऊन त्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणे
पुणे
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
षटकोळी
समाप्ती
एकविसाव्या शतकात झाली
सुरवात प्लॅस्टिक बंदीची
समाप्ती कधी होईल
नाही सांगता येणार
निर्धार सर्वांचा महत्त्वाचा
आपोआप नायनाट होईल
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
कवितेस पत्र
प्रिय कविता,
आता पत्रास कारण की मला ना तुला पत्र लिहायला सांगीतले आहे. त्यामुळे मी वेळात वेळ काढून हे पत्र लीहीत आहे. कशी आहेस ? छानच असणार .हो ना ?
तूला माहिती आहे का की तूझ्या मैत्रीमुळे कीतीजणांना तू आनंदी केलयस ? कविते तू आहेस म्हणून तर आम्ही साहित्यिक आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. आनंदी राहतो दुसऱ्यांनाही आनंदी करतो. खरोखरच मनातील भावना बाहेर येण्यासाठी कीती धडपडत असतात म्हणून सांगू तूला.सर्वांना हे शक्य नाही गं.पण ज्यांना ज्यांना तू भेटलीस ना त्यांना त्यांना तू खूप समाधान दिलेस. कारण तूझ्या मैत्रीमुळे ते सर्वजण व्यक्त होऊ शकले.
तूला आठवतयं का आपली मैत्री कशी झाली ती ? आठवलं ना ? मी महाविद्यालयात होते.प्रोफसरांनी मासिकासाठी लिहायला सांगितले होते. मीपण म्हटलं चला आपण एक कविता लिहू.विषय घेतला माझी शाळा.मग काय लागले शब्द आठवायला . आणि हळूहळू शब्द सुचत गेले व तू तयार झालीस.मी तूला वाचायला माझ्या मैत्रीणीला दिली.तीने तूला वाचले व म्हणाली छान झालीय कविता. कविते तूला सांगते मी खूप आनंदी झाले गं तेव्हा.तेव्हापासून आपली मैत्री कायम आहे.
आज तूझ्यामुळेच मला कवयित्री होण्याचा मान मिळालाय.तू आता माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहेस.तूला सांगते कविते तुझ्याबरोबर माझा वेळ कसा आणि कुठे जातो कळतच नाही बघ.तूला वाचण्यासाठी मी तूला घेऊन परगावी जाते व तिथे वाहवा मिळवते ना तेव्हा खूप बरं वाटतं.ऑनलाईन कीतीतरी कवितावाचन, काव्यलेखन स्पर्धमध्ये मी भाग घेते.आपली मैत्री चांगली असल्यामुळे माझी कविता सर्वांना आवडते.मला प्रमाणपत्रे मिळतात.मला खूप छान वाटते. समधान वाटते मला.तू माझी शब्दमय मैत्रीण आहेह. तूझी मैत्री खूप काळपर्यंत टीकवायची आहे. माझ्या मनातील भावना दुखावल्या वा सुखावल्या तर तूच माझी संगीनी असणार आहेस माझी समजूत घालायला व आनंदात सहभागी व्हायला.
आपण आपली मैत्री माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवू.हे माझे वचन आहे तूला.तू मला सोडणार नाहीस हा माझा ठाम विश्वास आहे.सतत माझ्या मनातील कल्पनेला प्रोत्साहन देणाऱ्या कविते हे पत्र वाचून मला अभिप्राय नक्की दे.
तूझ्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे.
कळावे. लोभ असावा.
तुझीच
माणिक
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
षटकोळी
प्रवास
जात आहे पुण्याला
मुलगीला माझ्या भेटायला
आनंदलय मन माझं
प्रवास चाललाय सुखाचा
आरामगाडी छानच आहे
विचार करतयं तुझं
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा कोल्हापूर