सहल
भिलार - पहिले पुस्तक गाव
एकमेकांना मानवी मनाची भावना समजावून सांगण्याचा एकमेव चांगला मार्ग म्हणजे पुस्तक. पुस्तके आमचे चांगले मित्र आहेत. ज्यामुळे आपण स्वतःचे मनोरंजन करू शकतो. ज्ञान वाढवून आपण विकास करू शकतो पुस्तके जीवनाला चांगले वळण देण्याचे काम करतात पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती सहज मिळते. वेल्स शहरात हे-ऑन-वेपासून प्रेरित होऊन, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील भिलार गाव हे देशातील "पहिले पुस्तक गाव" म्हणून घोषित करण्यात आले.सरकारच्या वतीने त्याच खेड्यातील लोकांशी चर्चेनंतर त्यांच्या घरातले 45 लोक जागा देण्याचे मान्य केले. त्यापैकी 25 घरांची निवड करण्यात आली. 4 मे 2017 रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमंत्री माननीय विनोद तावडेजी यांच्या नेतृत्वात मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने भिलार गावाला "पुस्तक गाव" घोषित केले.गावात साहित्याची सुमारे 15000 पुस्तके आहेत.कल्पनारम्य, कविता, धार्मिक, महिला, बाल साहित्य, पर्यावरण, लोकसाहित्य, जीवन आणि आत्मकथन अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची स्थापना वेगवेगळ्या ठिकाणी झाली. भिलार गांव महाबळेश्वरजवळ पाचगणीपासून km किमी अंतरावर आहे. ज्या 25 घरांमध्ये ती पुस्तकांमध्ये ठेवली गेली आहेत तेथील घरमालकांनी वाचकांना त्यांच्या घरात बसण्यासाठी आणि वाचण्यास जागा दिली आहे.ज्या वाचकाला जे पुस्तक हवे आहे ते त्या त्या विभागाप्रमाणे तिथे असलेल्या घरात जाऊन पुस्तके वाचतात.वर्तमानपत्र, मासिकांचा एक वेगळा विभाग आहे.जे भाषा प्रेमी, साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्यासाठी ही जागा चांगली आहे. मीही माझ्या काही मैत्रिणीसह तिथे गेले. प्रथम आम्ही ऑफिसला गेलो. तिथे भिलारवर प्रोजेक्टवर बनलेली एक डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली.खूप छान माहिती मिळाली.मग आम्ही आमची लीहलेली पुस्तके ऑफिसमध्ये भेट म्हणून दिली.त्यामुळे त्यांनी आम्हाला आभाराचे पत्र दिले. आम्हाला ते खूप आवडले.तिथे जाऊन आलेली आठवण म्हणून भिलारचे चित्र असेले मुद्रित कीचेन ,चहाचा कप विकत घेतले.मग भुकेची जाणीव झाली. जवळच आम्हाला स्वादिष्ट जेवण मिळाले. भोजना नंतर आम्ही एक एक विभाग बघू लागलो.प्रत्येक घराच्या बाहेरील खोलीत, वेगवेगळे विभाग आकर्षक चित्रांनी रंगविले आहेत.वाचकांना वाचण्यासाठी छान सोय केली आहे. असे विविध विभागात भेटी दिल्या. माहिती घेतली.जवळच एका ठिकाणी थांबून कोकम सरबत पिले.मनाला, तनाला शांतता देऊन तिथून निघालो. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही आठवणी मनात ठेवून परत आलो.वाटेत येताना पाचगणीत थांबून विविध सरबते,चॉकलेटस् खरेदी करुन आनंदाने, समाधानाने घरी परत आलो.सर्व मैत्रिणी साहित्यिक असल्यामुळे सहलीला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला होता.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881962530
No comments:
Post a Comment