स्पर्धेसाठी
शृंगाररस
विषय -मोरपंखी स्पर्श
मोरपंखी स्पर्श तुझा,
सजने लावी वेड मला .
हळुवार काटा शरीरावर,
दिसतो का पहा तुला.
हातात घेता हात तुझा,
रोमांचित झाली माझी काया.
अशी कशी ही कळत नाही,
या सृष्टीची अगाध माया .
नजरेतला तो अबोल इशारा,
सांगून गेला गुज मनीचे.
नकळत छेडल्या तारा ,
पाहून वदन त्या राणीचे .
स्पर्शातला तो ओलावा ,
अलवार जोजवतो मजला.
मोहरतो मी नखशिखांत ,
नाही माहिती तुजला .
मोरपीशी मखमली रंगांचा,
गालीचा अंथरलाय वाटेत.
कधी येशील सहजच माझ्या,
गजगामिनी तू या कवेत.
मनपाखरु माझे भिरभिरते ,
सतत तुझ्याच पाठीवरती .
प्रितगंध तुझ्या फुलातील,
प्रितभ्रमर हे असे प्राशिती.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment