Tuesday, 11 December 2018

चित्रकाव्य बालकाव्य ( मनीमाऊ )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

बालकविता

शिर्षक-- मनीमाऊ

मनीमाऊ मनीमाऊ,
अंग तुझे किती मऊ .

गोजिरवाणे तुझे अंग,
पाहून सारे झाले दंग.

गुबगुबीत तुझे गाल,
डोळे दिसतात हिरवे लाल.

लुसलुशीत तुझे पाय,
आवडे तुला दुधाची साय.

वाघाची मावशी म्हणती सारे,
आंजारतात,गोंजारतात सारी पोरे.

पितेस दुध वाटीभर,
फिरतेस तू घरभर.

तोंड वर करुन काय विचारतेस,
म्याव म्याव करुन ओरडतेस.

दात तुझे अनकुचीदार,
वाटे बाई भिती फार.

नाक लाल ईवले ईवले,
कशाने बरे असे झाले ?

बसली आहेस फरशीवर,
लागत असेल ना थंडगार?

कान ईवले टवकारले,
कोण तुला काय बोलले?

लक्षात ठेव एक गोष्ट,
सांगून ठेवते तुला स्पष्ट.

मनीमाऊ मनीमाऊ,
चोरुन दुध नको पिऊ.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment