😢😢 अंत एका ध्यासपर्वाचा 😢😢
सकाळी सकाळी एक बातमी समजली व काळजात चर्र...झाले. एक क्षणभर काही सुचेना.जेष्ठ दिग्दर्शक मा. यशवंत भालकर सरांचे आकस्मिक निधन... विचारच खुंटले.... यशवंत भालकर एक हसरं सतत धडपडणारे एक ऊत्साही व्यक्तीमत्व. सावित्रीच्या लेकी या ग्रुपच्या माध्यमातून सरांची ओळख झालेली.मला सावित्रीची लेक- आदर्श शिक्षिका पुरस्कार मा.यशवंत भालकर सरांच्या हस्ते मिळाला तेंव्हा मला खूप आनंद झाला होता. तेव्हापासून ते ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात होते.ग्रुपमधील सदस्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हायचे.सगळ्यांना प्रोत्साहन देत असत. मला तर नेहमी प्रेरणा द्यायचे.मुलांची,तब्येतीची आस्थेने चौकशी करत.आमच्या शाळेचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम होता.एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा तर त्या तोलामोलाचा पाहुणा हवा.माझ्या डोळ्यासमोर भालकर सर आले.पण ते येतील का ? असा शी शासंकता मनात होती.सहज मी फोन केला व येणार का विचारले अन् काय आश्चर्य ते लगेच हो म्हणाले.माझ्या तर आनंदाला पारावर राहिला नाही. तो कार्यक्रम खूप छान रितीने पार पाडला.अगदी शेवटपर्यंत हसतमुखाने वावरले.सर्वींना खूप बरे वाटले.माझ्या मनात सरांच्या बद्दलचा आदर आणखीन वाढला.त्यानंतर मी माझ्या कवितासंग्रह काढणार म्हटल्यावर माझ्याकडून कविता मागवल्या व वाचून छान अभिप्राय दिला.मला शुभेच्छा ही दिल्या एवढच नव्हे तर त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व्हावे या माझ्या इच्छेला दुजोरा देत सर्वात प्रथम हजर राहिले व तोंडभरून माझं व माझ्या पुस्तकाचं कौतुक केलं.मला नेहमी सावित्रीची लेक,बोला कवयित्री असं म्हणून बोलवायचे.ते शब्द अजून कानात घुमत आहेत.कोण बोलवणार आता ? खरचं सर तुम्ही खूप वेगळे व महान होतात.अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे.एवढा मोठा दिग्दर्शक पण अजिबात कशाचाही, कसलाच गर्व,अभिमान नव्हता.त्यामुळे आम्हाला सर्वांना ते कुटुंबातील सदस्यच वाटायचे.गरीब- श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असत. रंकाळा बचाव मोहीमेत सक्रिय होते.त्यांचे लिखाण रंकाळ्याभोवतीचं सामावलेले होते. विद्यापीठाच्या सिनेटपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांनी अनेक योजना राबविल्या. दररोज व्यायाम न चुकता करणाऱ्या , सतत हसतमुख राहून दुसऱ्यांना हसवत ठेवणे,आधार देणे हे कौशल्य त्यांच्यात होते.अशा माणसाचा मृत्यू असा अचानक व्हावा हे न पटण्यासारखे आहे. सुबक साहित्य कलामंचच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी आम्ही कवयित्री हा कार्यक्रम घेऊन आम्हा कवयित्रींना प्रोत्साहन दिले व सन्मान केला.भविष्यात या माध्यमातून आपण काय करणार आहोत याबद्दल दिलखुलास चर्चा केली.या सगळ्या आता कल्पनाच राहिल्या.या कल्पना पूर्ण तरी होऊ द्यायचं होतं. का दैवाने असा घाला घातला असेल बरं? ऊत्तर नाही सापडत.सर तुम्ही हवे होतात.पण नियतीपुढे कुणाचेच चालत नाही. पण एवढ्यात हे व्हायला नको होतं.. त्यांच्या आशा आकांक्षा खूप होत्या. त्या तरी पूर्ण व्हायला हव्या होत्या.सगळंच अनपेक्षितपणे घडलं.अविश्वसनीय आहे सगळं..आम्हाला आधार देणारे,प्रोत्साहन देणारे शब्द आम्हाला आता पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत. मायेचा हात आणि दयाळू नजर आता आम्हाला दिसणार नाही. आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो.हीच साश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली.🙏🙏🙏😢😢😢
साद घालतो आम्ही तुम्हास
याल का परतूनी या भूवरी
आस आम्हा आपल्या आशिर्वादाची
या परतूनी तुम्ही सत्वरी .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530
No comments:
Post a Comment