Monday, 3 December 2018

चित्रकाव्य ( निराश्रीत अश्रू )

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

निराश्रीत अश्रू

ध्येयासक्त नजर शोधते,
कुठे मिळेल आसरा मला.
निराश्रीत अश्रू वाहती ,
थोपवण्याची आहे कला.

झिडकारले जरी दुनियेने,
समर्थ तुझा आहे हा दादा.
बिलगून छातीशी निवांत,
रहा तू हाच माझा वादा .

सुकले अश्रू गालावरती ,
जरी ना आले कोणी पुसाया.
भविष्य ऊज्वल ध्येय ऊरी,
जाऊ गवसनी आकाशी घालाया.

लक्तरे वसनांची झाली , 
प्रदर्शन शरीराचे करते .
निर्धार मनीचा शोभतो,
तेज लोचनी लकाकते.

तान्हुल्याला घेऊन छातीवर,
जपतो भविष्य मी ऊद्याचे.
शपथ या आसवांची घेऊन,
बीज नष्ट करेन विषमतेचे.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment