Tuesday, 18 December 2018

हायकू ( खोपा )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय- चित्र हायकू

शिर्षक-- खोपा

सुगरणीची
जोडी शोभे सुंदर
कार्यतत्पर

मादी निवांत
नर बांधे घरटे
छानसे छोटे

दोन मजले
वर आणिक खाली
त्यांची हवेली

टांगले वर
विणकराने छान
दोलायमान

आश्वस्त तीही
दाखवून विश्वास
जोडी ही खास

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment