स्पर्धेसाठी
शृंगाररस कविता
विषय - मखमली तन
गोरे गोरे हात तुझे ,
अन् मखमली गं तन.
मऊमऊ दंड तुझे ,
झाले वेडे माझे मन.
स्पर्शता कापरा शरीरात,
दोलायमान मन झाले.
शहारली काया क्षणभर,
बेधुंद , बेबंध विचार आले.
त्या मिठीतला गोडवा ,
आसक्त तनाची ललना.
झाले अधीर मिलनाला,
वेगळीच मनीची कामना .
नवनीत वितळे अग्नीपाशी,
माझेही समर्पण तुझ्याशी.
कामासक्त झाली काया ,
समर्पित भावना मनाशी.
मखमली स्पर्शातला गोडवा,
हवाहवासा सदा मजला.
अंकुरते बीज प्रितीचे ,
दिसले का तव हृदयाला ?
ये अशी तू जवळी माझ्या,
बिलगून अशी तनूशी.
मनामनाच्या तारा छेडूनी,
सजनाला रमू दे सजनीशी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment