Wednesday, 5 December 2018

कविता ( ज्ञानियांचा राजा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- ज्ञानियांचा राजा

                  ( १ )

थोर संत योगी तत्वज्ञानी
प्रवर्तक भागवत संप्रदायाचे
लिहून भावार्थदीपिका महान
व्यक्त विचार तत्वज्ञानाचे

               ( २ )

ज्ञानियांचा राजा थोर ज्ञानेश्वर
प्रेरणा आध्यात्मिक लोकशाहीची
दिधले सकल जनांना ग्रंथातून
महती मराठी संस्कृतीची

              ( ३ )

ज्ञानियांचा राजा ज्ञानदेव 
निवृत्तीनाथ सद्गुरु तयांचे 
संकल्प ज्ञान संस्कृत भाषेतील
पाकृत मध्ये आणायाचे

             ( ४ )

वर्णिली महती मराठी भाषेची 
लिहील्या ओव्या नऊ हजार
दुजा ग्रंथ जीव-ब्रम्ह ऐक्याचा 
तत्वज्ञानाचा केला प्रचार

            ( ५ )

केले गर्वहरण चांगदेवाचे
लिहून चांगदेव पासष्टी
केले तीर्थाटन अमृतानुभवानंतर 
समाधीमरणाची झाली पुष्टी 

             ( ६ )

लिहून पसायदान वांछीले
ईच्छा पुऱ्या व्हाव्या सर्वांच्या
माऊली म्हणती संप्रदाय वारकरी
पाया रचला तीरी चंद्रभागेच्या 

             ( ७ )

संजीवन समाधी इंद्रायणी काठी
मावळला ज्ञानसूर्य सहजच
प्रणाम तुजला एकवीस वय
झुकतो माथा आपसूकच

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment