माझं ही ऐका साठी
शेतमालाला हमीभाव द्या!!
भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील शेतकरी दिवसरात्र आपल्या शेतात कष्ट करत असतो.आपल्या घरादाराची सारी जबाबदारी त्याच्यावर असते.आपण बाजारातून एखादी वस्तू विकत घेतो.त्यावेळी त्यापाठीमागील शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपण त्या शेतमालाची किंमत खूप कमी करत असतो. मॉलमध्ये विचार न करता भरमसाठ खर्च करणारे आपण शेतकऱ्यांचा माल विकत घेताना किंमतीमध्ये कमालीची घासाघीस करतो.त्यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आगतिक, असहाय्य भाव आपल्याला का बरं दिसत नाहीत. आपला तो पोशिंदा आहे, तो जर काम करत नाही असे म्हणाला, जर संपावर गेला, किंवा जर त्याने बंड पुकारले सर्व समाजविरुद्ध तर.... काय होईल कल्पनाच करवत नाही. ज्याच्या जीवावर आपण जगतो त्यालाच आपण किंमत देत नाही. आजची परिस्थिती तर खूपच दयनीय आहे. कांद्याने तर शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. फायदा तर सोडाच पण घातलेले भांडवलाचे ,मजुरीचे पैसेही त्याच्या हाताला लागत नाहीत. यासारखे दुर्दैव कोणतेच,कुठल्याही देशात नसेल.सरकारची आश्वासन पुर्तीमधील कमालीची उदासीनता,मालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफीचा फुसका बार ,सकस बीयानांचा अपुरा पुरवठा,अनियमित वीजपुरवठा, पाण्याची कमतरता,मजुरांचा अभाव अशा कीतीतरी समस्यांना आजचा शेतकरी तोंड देत आहे. आजचा शेतकरी या सर्व दुष्टचक्रात अडकला आहे.त्याच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली आहे. कुटुंबातील लोकांसाठी जगावे का कर्जाच्या बोझ्याखाली गुदमरुन आत्महत्या सारखा पर्याय निवडावा का फासावर जावे? त्याला कळेना झाले आहे. सावकारीचा अक्राळविक्राळ हात त्याच्या नरडीचा घोट घेत आहे. जनावरांची , बैलांची अवस्था ही दयनीय झाली आहे.अच्छे दिन कधी येणार ? का या फक्त घोषणाच राहणार. चालू सरकारने तर शेतकऱ्यांना जगणेच नकोसे केलयं. दिलेली आश्वासने फक्त मतं मिळवण्यासाठीच होती का? यक्ष प्रश्न आहे.काँग्रेस सरकार म्हणते आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची परिस्थिती बदलतो. पण आता कुणावर कीती व कसा विश्वास ठेवायचा हे कळेनासे झाले आहे. शेतकरी कीती दिवस हे सहन करणार? कुणी आहे का वाली? देता का कुणी न्याय या शेतकऱ्याला ?
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर,
9881862530
No comments:
Post a Comment