स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
अष्टाक्षरी
विषय - दुष्टचक्र
दुष्टचक्र फिरतयं,
माझ्या रोज डोक्यावर.
समजेना काय करु,
जगू ? जावू फासावर ?
सावकार आवळतो,
फास माझ्या गळ्यावर.
देऊ कसा आता पैसा,
पीक नाही खळ्यावर ?
घरदार सारं गेलं,
चंद्रमौळी नाही आता.
हाती काय माझ्या आलं ?
कोण आहे माझा त्राता ?
शेतकरी काळजीत,
चिंता आभाळभरुन.
मन ऊदास झालयं,
आले डोळे ओलावून.
हात विक्राळ केसाळ,
गोळा करतो कमाई.
आगतिक असहाय्य,
करु कशी भरपाई ?
बैल करतो विचार,
धनी कसा ऊभारेल ?
गाडी जोडून शेतात,
कसा बरं मी धावेल ?
दुष्टचक्र थांबेल का ?
अच्छे दिन येतील का ?
पोशिंद्याला जगताना,
समाधान लाभेल का ?
© कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
9881862530
No comments:
Post a Comment