Sunday, 6 August 2017

राखी एक अतुट बंधन

स्पर्धेसाठी

  राखी एक अतुट बंधन

    सोनियाच्या ताटी      ऊजळल्या ज्योती , ओवाळीते भाऊराया मी , खरच कीती छान वाटत ना ऐकायला ? मस्तच , अहो लहानपणापासून या सणाबद्दल खूप आत्मियता आहे.

     भावाला बहीणीने ओवाळायचे ,औक्षण करायचे , त्याच्या जीवनात अक्षय सुखसमृद्धी लाभू दे अशी मनोकामना करायची , त्याच्या मणगटावर रेशमी धागा प्रेमाने बांधायचा व त्याच्याकडून ओवाळणी घ्यायची.हे परंपरागत चालत आलेले आहे. बहीणीला भेटवस्तू देत असताना तिच्या रक्षणाची जबाबदारीही भावावर असते.

  आपली बहीण सुरक्षित घरी यावी असे प्रत्येक भावाला वाटते.असे वाटणे साहजीकच आहे.पण आज आपण समाजात पाहतो , चौकाचौकात मुलांचे टोळके बसलेले असते .समोरुन एखादी स्त्री , मुलगी निघाली की , अश्लिल भाषेत शेरेबाजी करणे हे नित्याचेच झाले आहे .यावेळी त्यातील प्रत्येक मुलाने जो कुणाचातरी भाऊ असतो , व समोर कुणाचीतरी बहीण असते विचार केला तर , माझीही बहीण असच कुठतरी बाहेर गेली असेल व तिलाही कुणितरी चिडवत आ
असेल तर ? बस !! एवढा विचार जर प्रत्येकाने केला तर रक्षाबंधन सण साजरा केला असे होईल .

भावाबहीणींचे नाते हे अतूट आहे.ते नाते लेचेपेचे कधीच नसते.याचा पाया भक्कम असतो.सहोदर आसलेली ही दोघे एकमेकांचा विचार करणारच, आदर करणारच. त्यामुळे हे नाते अखंड टिकून राहणारे असते.

      रक्षाबंधन सणाबद्दल अनेक दंतकथा  व जिवंत ऊदाहरणे आहेत .प्रत्येक मुलीला / बहीणीला आपल्या भावाबद्दल अभिमान असतो .त्यासाठी तो सदैव तिच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतो.त्यासाठी प्रत्येकाने आपली नजर बदलली पाहीजे , विचार आपोआपच बदलतील व .हे नाते निकोप राहील .

     अशा सुंदर ,पवित्र सणाला जाणून घेऊया व समर्थ भारत बणवूया .

   श्रीमती  माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment