स्पर्धेसाठी
कविता
विषय -- राधा ही बावरी
कृष्णसखी ही वेडी झाली ,
ऐकुन कान्हाची बासरी .
म्हणून म्हणती सारे तीला ,
आहे राधा ही बावरी .
कान्हाच्या अवखळ लीला ,
भुलवीत राही सदा तीला .
विसरुन गेली देहभानही ,
मनी असे फक्त कृष्णझुला .
सख्या भोवती झाल्या गोळा
परी ही गुंतली विचारातच .
सांगे कारण झाकुन सत्य ,
नाही कुणी गं माझ्या मनात.
वृंदावनी ही खेळ खेळती ,
गोपगड्यासह आनंदाने .
राधा राधा करतो कान्हा ,
गोपी थकल्या या विचाराने .
राधाकृष्णाची जमली जोडी, तीनही जगी पावन झाली .
प्रेमसागरात डूंबताना ,
सकलांची ती प्रेरणा झाली .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता .शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment