Thursday, 3 August 2017

पहाटवारा

स्पर्धेसाठी

     आठोळी स्पर्धा

विषय -- पहाटवारा

स्पर्शता अलवार पहाटवारा
आला अंगावरी शहारा
रोमारोमात तसा पसरला
प्रितीचा गोड न्यारा पिसारा

लागता अंगाला गारवा
साखरझोपही चाळवली
सांगे हळुच कानात वारा 
पूर्वदिशेला प्राची ऊगवली

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment