Sunday, 6 August 2017

रक्षाबंधन

स्पर्धेसाठी

     विषय -- रक्षाबंधन

श्रावणातील उत्सव माझा ,
आनंद देतसे मानवा .
वाट पाहते आतुरतेने ,
देतो सकलांना उल्हास .

बंधन आहे हे प्रेमाचे ,
नाही वाणवा कशाची .
रेशमाचा पवित्र धागा ,
साक्ष देतोय निखळ प्रेमाची.

नाते हे भावाबहीणींचे ,
कधीही न संपणारे ,तुटणारे.
सतत फुलतच जाणारे ,
एकमेकांना प्रेरणा देणारे .

रक्षाबंधन साजरा करु ,
स्री-जातीचा करु आदर .
परस्त्री मातेसमान मानू ,
स्त्रीशक्तीचा करु जागर .

रक्षण एकमेकांचे करु ,
जबाबदारी आहे सर्वांची.
बहीण ,घर हवे सुरक्षित तर,
जपू नाती भावाबहीणींची .

    कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment