स्पर्धेसाठी
गणपती विशेष काव्य स्पर्धा
गजानन
गजाननाचे सुंदर रुप ,
गणाध्यक्षही म्हणती याला.
विघ्नहर्ता हा सकलजनांचा ,
गौरीतनया वंदन तुजला.
विनायकाची आठवू कीर्ती
लंबोदराची गाऊया महती.
गणपती बाप्पा मोरया ,
गजवदनाची म्हणू आरती.
हेरंब तू संकटमोचन ,
गणराज हे सुंदर नांव .
वक्रतुंड तू शांतीदेवता ,
श्रीपती कैलाश तुझे गांव.
पार्वतीनंदन तू लाडका ,
मंगलमूर्ती तुझी लोभसवाणी
मोरयाच्या गजरातच देवा ,
बुद्दीदेवा गातो तुझीच गाणी.
एकदंत हे रुप तुझे ,
धुम्रवर्ण शोभे अतीसुंदर .
भालचंद्राचे रुप साजरे ,
गणेशा नमन तुला अगोदर.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment