Tuesday, 1 August 2017

लेक ही वंशाचा दिवा

स्पर्धेसाठी

              काव्यस्पर्धा

      लेक ही वंशाचा दिवा

मानलं आजवर लेकालाच ,
फक्त वंशाचा लाडका दिवा.
पण ठेवा ध्यानात सत्वर ,
लेक ही वंशाचा आहे दिवा.

माहेर आणि सासर ,
सांधते दुवा ही दोन्हीमधली.
जपते नाती कौशल्याने ,
गुंफली नाती एकमेकांतली.

नका मानू परकी तीला ,
मुलगीच तुमची ती लाडकी.
घरदार सोडलं तुमच्यासाठी,
नका दाखवू तुम्ही मालकी.

प्रेमरुपी तेलाने तगू द्या ,
वात्सल्याचा प्रकाश दारी.
माणुसकीच्या मशाली आता
पेटु द्या तेजाने घरोघरी .

लेकच आधार जीवनाचा ,
फुलासारखी फुलू द्या .
नका खुडू तीला गर्भातच ,
सुगंधीत कर्तृत्व बहरु द्या.

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530

No comments:

Post a Comment