Friday, 25 August 2017

संकटमोचन

स्पर्धेसाठी

चित्रावरुन कविता

    संकटमोचन

हे वक्रतुंड महाकाय गणेशा, रुप तुझे हे लोभसवाणे .
वंदन तुजला रे मनोभावे ,
भक्तीने गातो तुझेच गाणे.

पोशिंदा जगाचा आज ,
चाललाय बघ फासावर .
तुझाच आसरा त्यांना आता,
सावर त्यांना तू हातावर .

मूषकही धावे मदतीला ,
टाके कुरतडुनी ते फास .
अविचारांच्या कृतीला देवा ,
थांबव तू आता हमखास .

बुद्धीदेव तू सकलजनांचा ,
संकटमोचन म्हणती तुजला.
जगणे मुश्कील केले यांचे  ,
बांध घाल तू अपप्रवृत्तीला .

वृक्षही झाला निष्पर्ण शांत,
शेतकऱ्यांचे पाहुन दुःख .
नाही दया शासनदरबारी ,
मिळो जगण्यात तरी सुख .

  कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर

No comments:

Post a Comment