Thursday, 31 August 2017

इंद्रधनु व क्षितिज

स्पर्धेसाठी

        शब्दचारोळी

     इंद्रधनु व क्षितिज

ऊनपावसाचा खेळ सुंदर
नभांगणी अतीमोहक चाले
पहा इंद्रधनु हे प्रकटले
क्षितिजावर सप्तरंगी डोले.

        रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

Wednesday, 30 August 2017

प्रेमविरह

स्पर्धेसाठी

विषय -- प्रेमविरह

एकमेकांच्या संगतीतले
मोरपीसी हळुवार क्षण
प्रेमविरह अग्नीसमान
जाळतो काया कण न कण.

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

Tuesday, 29 August 2017

ज्ञानभास्कर

स्पर्धेसाठी

         चित्रचारोळी

जरी कोमेजली फुले तरी
सुगंध तो संपणार नाही
ज्ञानभास्कर पुस्तकातला
कधीही अंधारणार नाही.

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.

Monday, 28 August 2017

विघ्नहर्ता

स्पर्धेसाठी

        विघ्नहर्ता

हे संकटमोचन गजानना
तूच त्राता , तू विघ्नहर्ता
गौरीनंदन गजवदना रे
पूजनीय तू हे सुखकर्ता

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर

अदायें

प्रतियोगिता

विषय -- अदायें

हर एक अदा की बात
निराली होती है जानेमन
उफ् ये तुम्हारी अदायें
जलाती है मेरा तन और मन

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

Sunday, 27 August 2017

श्रद्धा हवी डोळस

स्पर्धेसाठी

     श्रद्धा हवी डोळस

विवेकाच्या पोतडीतून ,
विचारांच्या भट्टीतून .
यावी तावून सुलाखुन
श्रद्धा हवी डोळस मनातून.

नको अंधश्रद्धा , अंधभक्ती,
विज्ञानाचा आधार असावा.
सप्रमाण सिध्द असावी,
श्रद्धा ही डोळस भावा.

परंपरा अन् चालीरीतीतून,
चालत आली मुकपणे .
विज्ञानयुगात उत्तर मिळते,
श्रद्धा हवी डोळस नीटपणे.

सांगायचीय आम्हाला ती,
येणाऱ्या भावी पिढीला.
भेद ओळखा सा-यांचा ,
श्रद्धा हवी डोळस तुम्हाला.

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

गजानन

स्पर्धेसाठी

गणपती विशेष काव्य स्पर्धा

          गजानन

गजाननाचे सुंदर रुप ,
गणाध्यक्षही म्हणती याला.
विघ्नहर्ता हा सकलजनांचा ,
गौरीतनया वंदन तुजला.

विनायकाची आठवू कीर्ती
लंबोदराची गाऊया महती.
गणपती बाप्पा मोरया ,
गजवदनाची म्हणू आरती.

हेरंब तू संकटमोचन ,
गणराज हे सुंदर नांव .
वक्रतुंड तू शांतीदेवता ,
श्रीपती कैलाश तुझे गांव.

पार्वतीनंदन तू लाडका ,
मंगलमूर्ती तुझी लोभसवाणी
मोरयाच्या गजरातच देवा ,
बुद्दीदेवा गातो तुझीच गाणी.

एकदंत हे रुप तुझे ,
धुम्रवर्ण शोभे अतीसुंदर .
भालचंद्राचे रुप साजरे ,
गणेशा नमन तुला अगोदर.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

Saturday, 26 August 2017

अखेर चुक कोणाची

उपक्रम

     चारोळी

महीला नाहीत सुरक्षित
गरीबांना चिंता भुकेची
शेतकरी करतो आत्महत्या
मग अखेर चुक कोणाची ?

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता शिरोळ ,
जि. कोल्हापूर

पक्षांतर

स्पर्धेसाठी

          वात्रटिका

           पक्षांतर

स्थान  टीकवण्यासाठी
चाललीय मारामार सर्वांची
पक्षांतर पर्याय सर्वांपुढे
परीक्षाच ही नीष्ठावंताची

नवा पक्ष नवी टोपी
नेता फिरतोय दीमाखात
गळचेपी झाली कार्यकर्यांची
पक्षनिष्ठा आहे  दुःखात

सामांन्याची कदर ना कुणा
हीत आपले ओळखा रे
पाठीमागे जायचे कुणाच्या
प्रश्न मोठाच पडलाय रे.

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर

पक्षांतर

स्पर्धेसाठी

          वात्रटिका

           पक्षांतर

स्थान  टीकवण्यासाठी
चाललीय मारामार सर्वांची
पक्षांतर पर्याय सर्वांपुढे
परीक्षाच ही नीष्ठावंताची

नवा पक्ष नवी टोपी
नेता फिरतोय दीमाखात
गळचेपी झाली कार्यकर्यांची
पक्षनिष्ठा आहे  दुःखात

सामांन्याची कदर ना कुणा
हीत आपले ओळखा रे
पाठीमागे जायचे कुणाच्या
प्रश्न मोठाच पडलाय रे.

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर

अत्याचार

उपक्रम

     आठोळी

      अत्याचार

दबलेल्यांनाच दाबले जाते
बाजूला करा असहायता
अत्याचाराचा सामना करु
बाजूला ठेवू सहनशिलता

प्रतिकार करु अन्यायाचा
स्वत्वाचे ठेवून हो भान
नाही सहन करणार आता
घेऊ हीच खरी आन व शान.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर

Friday, 25 August 2017

गणेशोत्सव

स्पर्धेसाठी

     आठोळी उपक्रम

विषय -- गणेशोत्सव

लंबोदर पितांबर गजानना
ऊत्सव तुझ्या आगमनाचा
आणलं तुला वाजतगाजत
क्षण आज आला आनंदाचा

आशिर्वादाने तुझ्या सर्वजण
माणुसकीने वागू लागतील
वापरुन बुद्धी योग्य ठीकाणी
संवेदनशिलतेने डोलतील .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर

गणरायाचे आगमन

स्पर्धेसाठी

   झटपट चारोळी स्पर्धा

     गणरायाचे आगमन

भक्त उभे स्वागताला
झाले गणरायाचे आगमन
सुखसमृद्धीचे मागून लेणे
प्रेमभावे करीती औक्षण .

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

संकटमोचन

स्पर्धेसाठी

चित्रावरुन कविता

    संकटमोचन

हे वक्रतुंड महाकाय गणेशा,
रुप तुझे हे लोभसवाणे .
वंदन तुजला रे मनोभावे ,
भक्तीने गातो तुझेच गाणे.

पोशिंदा जगाचा आज ,
चाललाय बघ फासावर .
तुझाच आसरा त्यांना आता,
सावर त्यांना तू हातावर .

मूषकही धावे मदतीला ,
टाके कुरतडुनी ते फास .
अविचारांच्या कृतीला देवा ,
थांबव तू आता हमखास .

बुद्धीदेव तू सकलजनांचा ,
संकटमोचन म्हणती तुजला.
जगणे मुश्कील केले यांचे  ,
बांध घाल तू अपप्रवृत्तीला .

वृक्षही झाला निष्पर्ण शांत,
शेतकऱ्यांचे पाहुन दुःख .
नाही दया शासनदरबारी ,
मिळो जगण्यात तरी सुख .

  कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर

संकटमोचन

स्पर्धेसाठी

चित्रावरुन कविता

    संकटमोचन

हे वक्रतुंड महाकाय गणेशा, रुप तुझे हे लोभसवाणे .
वंदन तुजला रे मनोभावे ,
भक्तीने गातो तुझेच गाणे.

पोशिंदा जगाचा आज ,
चाललाय बघ फासावर .
तुझाच आसरा त्यांना आता,
सावर त्यांना तू हातावर .

मूषकही धावे मदतीला ,
टाके कुरतडुनी ते फास .
अविचारांच्या कृतीला देवा ,
थांबव तू आता हमखास .

बुद्धीदेव तू सकलजनांचा ,
संकटमोचन म्हणती तुजला.
जगणे मुश्कील केले यांचे  ,
बांध घाल तू अपप्रवृत्तीला .

वृक्षही झाला निष्पर्ण शांत,
शेतकऱ्यांचे पाहुन दुःख .
नाही दया शासनदरबारी ,
मिळो जगण्यात तरी सुख .

  कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर

गजानन

स्पर्धेसाठी

  शब्दानुसार चारोळी स्पर्धा

श्री गजानना लंबोदराय
मुषक वाहनावरी बैसुनी
आला दारी करुया स्वागत
मोदक , लाडू , भाव घेऊनी.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

Thursday, 24 August 2017

बुद्धीदेवता

स्पर्धेसाठी

       चित्रचारोळी

नर्तन करत जा बालगणेशा
सांगते उपदेश पार्वतीमाता
दे बुद्धी पर्यावरणरक्षणाची
होईल समाधानी धरणीमाता

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर

नातं तुझ्या माझ्यातलं

स्पर्धेसाठी

                चारोळी

      नातं तुझ्या माझ्यातले

कधीही न संपणारं , अभंग
असे नातं तुझ्या माझ्यातलं
एकमेकांच्या सहवासातून
कायम फुलतच राहीलेलं .

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

अर्धांगिनी

स्पर्धेसाठी

        चारोळी

     विषय -- अर्धांगिनी

सुखदुःखाच्या समयी राहते
सदैव ती सोबत अर्धांगिनी
संसाररथाच्या गाड्याबरोबर
स्वत्व जपते ती सौदामिनी .

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

Wednesday, 23 August 2017

अभिष्टचिंतन

         अभिष्टचिंतन

                                                                दिप देतो प्रकाश सकलांना
ऊजळीत जातो तिमीरघन
दीपक देतो ज्ञानप्रकाश
तेजाळतो ईथला  अज्ञानघन

अभिष्टचिंतन करु दादांचे
भरभराटीचे जीवन मिळो
आरोग्यसंपन्न आयुष्याचे
दान लाभो ते आम्हा कळो

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर

क्षण सुगंधी आठवांचे

ऊपक्रम

      चारोळी

   क्षण सुगंधी आठवांचे

देतात मनाला दिलासा
क्षण सुगंधी आठवांचे
ठेऊ कुपीत ते मनाच्या
साठवून मर्म भावनांचे.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

Monday, 21 August 2017

बाप्पाचे मनोगत

स्पर्धेसाठी

     वात्रटिका

     बाप्पाचे मनोगत

नाचत होते सर्वजण म्हणत
गणपती बाप्पा मोरया हो
घरी आणलं एकदा प्रेमाणे
खुष पाहुन पाहुणचार तो.

कान किटले ऐकुन गाणी
शांता , सोनू अन डीजेचा
थकले डोळे पाहुन आता
मर्कट नाच या भक्तांचा .

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

बैल मित्र शेतकऱ्याचा

स्पर्धेसाठी

     बैल मित्र शेतकऱ्याचा

शेतकरी जगाचा पोशिंदा
तर बैल मित्र शेतकऱ्याचा
दोघांची चाललीय कुतरओढ करुया प्रतिकार अन्यायाचा.

   रचना

श्रीमती माणिक नागावे

कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Sunday, 20 August 2017

ख्वाहिश

प्रतियोगिता

     ख्वाहिश

चारों तरफ हो नाम तुम्हारा
ख्वाहिश है मेरी तुमसे
गगन चुमेगा कदम तुम्हारे
कामयाबी पूछेगी पता हमसे

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

पोळा

स्पर्धेसाठी

      पोळा

एकदिवसाचा नसावा सण
बैलपोळा हा बैलांचा
भूतदयेचा भाव असावा
आदर करु एकमेकांचा .

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर

Friday, 18 August 2017

प्लॅस्टिक बंदी

स्पर्धेसाठी

      चित्रकाव्य

     प्लॅस्टिक बंदी

गोमाता सर्वांचीच माता ,
झाली तिची ही दशा .
खाद्यान्नाबरोबर खाऊन ,
प्लॅस्टिक झाली ही दुर्दशा .

संपले जरी शरीर तरी ,
प्लॅस्टिक कधी ना संपते.
जीव जातो मुक्या जीवांचा, 
जग फक्त पर्याय शोधते .
     

दिला झुगारुन आदेश .
प्लॅस्टिकवर घाला आळा .
सांगून थकले सारे आज ,
आता तरी नियम पाळा .

जबाबादारी जाणा सर्वांनी ,
करा प्लॅस्टिकमुक्त जगाला.
वाचवा सर्वांना यांपासून ,
आनंदी करा भूमातेला .

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Thursday, 17 August 2017

पतेती

स्पर्धेसाठी

        चारोळी

    विषय -- पतेती

चला करु मतभेद दूर आज
एकमेकांना देऊन आलिंगन
पश्चाताप हेच खरे औषध
पतेतीतून होऊ आज पावन.

  
     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

प्रेम

स्पर्धेसाठी

        प्रेम

स्नेह वाढतो आपोआप
प्रेमाच्या या गावी जाता
आशिषरुपी प्रसाद मिळतो
जेष्ठांसमोर नतमस्तक होता.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Wednesday, 16 August 2017

हिरवळ

स्पर्धेसाठी

         हायकू

विषयृ -- हिरवळ

ही हिरवळ
दाटली चहुकडे
ही दरवळ

प्रसन्न मन
पाहून हिरवळ
पुलकीत हे तन

गार हा वारा
झोंबतोय अंगाला
आला शहारा

गवत मऊ
लुसलुशीत छान
असेच ठेऊ

झाडे लावूया
हिरवाई जपूया
सुखी करुया

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि, कोल्हापूर

Tuesday, 15 August 2017

काव्यगंध

स्पर्धेसाठी

चारोळी

     काव्यगंध

काव्यपूर्तीचा आनंद झाला
मनी फुलला काव्यगंध
मनोमनीषा पुलकीत झाल्या
शब्दातून पसरला हा सुगंध 

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

हुतात्मा

स्पर्धेसाठी

        चारोळी

      विषय -- हुतात्मा

पत्करुन वीरत्व देशासाठी
झाला जवान हुतात्मा
देऊनी प्राणांची आहुती
झाला वीरांचा शांत आत्मा

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

स्वप्नातील भारत

स्पर्धेसाठी

       चारोळी

विषय -- स्वप्नातील भारत

सुंदर स्वप्नातील भारतात
नांदावी मानवता,व शांतता
नात्यात असावी कायमची
संवेदनशिलतेची दृढता .

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर

तिरंगा

स्पर्धेसाठी

       चित्रचारोळी

       तिरंगा

नभी फडकतो आभिमानाने
बलिदान वीरांचे साक्षिला
संस्कार , समृद्धीची शोभा तू
गतीमान चक्र ते साथीला .

      रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

Monday, 14 August 2017

राधा ही बावरी

स्पर्धेसाठी

             कविता
  
    विषय -- राधा ही बावरी

कृष्णसखी ही वेडी झाली ,
ऐकुन कान्हाची बासरी .
म्हणून म्हणती सारे तीला ,
आहे राधा ही बावरी .

कान्हाच्या अवखळ लीला ,
भुलवीत राही सदा तीला .
विसरुन गेली देहभानही ,
मनी असे फक्त कृष्णझुला .

सख्या भोवती झाल्या गोळा
परी ही गुंतली विचारातच .
सांगे कारण झाकुन सत्य ,
नाही कुणी गं माझ्या मनात.

वृंदावनी ही खेळ खेळती ,
गोपगड्यासह आनंदाने .
राधा राधा करतो कान्हा ,
गोपी थकल्या या विचाराने .

राधाकृष्णाची जमली जोडी, तीनही जगी पावन झाली .
प्रेमसागरात डूंबताना ,
सकलांची ती प्रेरणा झाली .

       कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता .शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Sunday, 13 August 2017

कृष्ण जन्मला

स्पर्धेसाठी

         चारोळी

विषय - कृष्ण जन्मला

कृष्ण जन्मला आज घअन्
आनंदाने नाचू गाऊ चला
खेळू गोपाळकाला , अन्
पाळण्याला झोका देऊ चला

       रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

होय मी तिरंगा बोलतोय

आजचा उपक्रम

            कविता

   होय मी तिरंगा बोलतोय

तीन रंग माझे बोलके ,
त्यागाची साक्ष देतो भगवा.
मांगल्य त्या शुभ्रतेत असे ,
समृद्धीचे लक्षण हा हीरवा .

दिली आहुती प्राणांची ,
माझ्यासाठी स्वातंत्रवीरांनी.
त्यातूनच परत नीपजले ,
हजारो वीर स्वातंत्रसेनांनी .

सान , थोर सारी जनता ,
टपली करण्या माझे रक्षण .
दिली आहुती  प्राणांची  ,
माझ्यावर करुन औक्षण .

आज पाहतो इतिहास मी,
अभिमानाने फुलते छाती.
झेंड्यासाठी कलह पाहता ,
माना शरमेने झुकती.

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर

वर्षपूर्ती

स्पर्धेसाठी

क्षण हा आला वर्षपूर्तीचा
समाधान अन् कर्तव्यपूर्तीचा
आले आज आनंदा भरते
पाहुन सण हा ऊत्साहाचा.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

आई

           स्पर्धेसाठी

               आई

आई शोधते मी निवारा ,
तूझ्याच ग पदराखाली.
आगतिक , असहाय्य मी ,
या जगातील मांडवाखाली.

मूर्ती तूझी साजरी ,
लोचनात या तरळली .
खंबीर मन झाले बघ ,
भिती दूर ती पळाली .

माया , ममता आई ,
हे बंध खरे रेशमाचे .
रेशीम गाठी सुटत नसतात ,
लक्षात असते हे ठेवायचे .

शब्द तूझ्या काळजातले ,
जोजवतात नेहमी मजला .
प्रेमाच्या अतूट जीवनात ,
करते प्रणाम तुजला .

      कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Saturday, 12 August 2017

शृंगार

उपक्रम

      चारोळी

विषय -- शृंगार

शृंगाराच्या वेलीवर
पूर्णत्वाचे लागेल फूल
कृत्रीमतेची त्यावर नसावी
कधीही चढवलेली झूल.

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

कृष्णसखा आला गोविंदा

स्पर्धेसाठी

           चारोळी

  कृष्णसखा आला गोविंदा

कृष्णसखा हा गोपाळांचा
म्हणती सारे आला गोविंदा
सहवासात त्याच्या रमती
नाही तोटा कधीही आनंदा.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

गोपाळकाला

स्पर्धेसाठी

              चारोळी

   विषय   --- गोपाळकाला

कृष्णसख्याचा आवडता
आलाहो हा गोपाळकाला
सुखदुःखाच्या साक्षिने
करुया मोकळे एकमेकाला.

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,

संकल्प

स्पर्धेसाठी
      
             चारोळी

     विषय --    संकल्प

मनी धरावा नेहमीच
कार्यरतपणाचा संकल्प
त्यासाठी मनी नसावा
कधीही कोणताही विकल्प.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Friday, 11 August 2017

अभिनय

स्पर्धेसाठी

            चित्रकाव्य

           अभिनय

प्रेम हे बहीणभावाचे ,
अतूट असे या जगती .
गाऊ कीती महती याची ,
छान तुझी माझी प्रीती .

गरीबीतला खेळ आमचा ,
मांडलाय आपण रस्त्यावर .
रडू नको धिर धर थोडा ,
खाऊ देते खेळ झाल्यावर .

अजून थोडी कड काढ ,
अभिनय तुझा रे चांगला .
रंगवलेल्या चेहऱ्यावर आज,
भाकरीचा चंद्र दाखवला .

कानटोपीवर कीरीट सजला
गळ्यात हार शोभला.
पाहुन रुप तुझे हे सुंदर ,
मनी करुणाभाव प्रकटला.

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर

चंद्र , चांदणे , रात्र

स्पर्धेसाठी

               चारोळी

      चंद्र ., चांदणे , रात्र

चंद्र आला नभात जेव्हा 
टिपूर चांदणे बरसू लागले
रात्र सरता सरता पहा
सूर्यबिंब डोकाऊ लागले.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.

Tuesday, 8 August 2017

भाऊराया

स्पर्धेसाठी

         चित्रचारोळी

         भाऊराया

आवरुन तुला निटनेटके
आज नेतो मी तुला शाळेला
भाऊराया तुझा पाठीराखा
निर्धास्त ठेवीन  बहीणीला

  रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Monday, 7 August 2017

भाऊराया

स्पर्धेसाठी

   झटपट चारोळी स्पर्धा

विषय -- भाऊराया

ओवाळीते मी भाऊराया
पवित्र दिनी रक्षाबंधनाच्या
कर रक्षण तू परस्त्रीचेही
हीच भेट मनात बहीणीच्या

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Sunday, 6 August 2017

राखी एक अतुट बंधन

स्पर्धेसाठी

  राखी एक अतुट बंधन

    सोनियाच्या ताटी      ऊजळल्या ज्योती , ओवाळीते भाऊराया मी , खरच कीती छान वाटत ना ऐकायला ? मस्तच , अहो लहानपणापासून या सणाबद्दल खूप आत्मियता आहे.

     भावाला बहीणीने ओवाळायचे ,औक्षण करायचे , त्याच्या जीवनात अक्षय सुखसमृद्धी लाभू दे अशी मनोकामना करायची , त्याच्या मणगटावर रेशमी धागा प्रेमाने बांधायचा व त्याच्याकडून ओवाळणी घ्यायची.हे परंपरागत चालत आलेले आहे. बहीणीला भेटवस्तू देत असताना तिच्या रक्षणाची जबाबदारीही भावावर असते.

  आपली बहीण सुरक्षित घरी यावी असे प्रत्येक भावाला वाटते.असे वाटणे साहजीकच आहे.पण आज आपण समाजात पाहतो , चौकाचौकात मुलांचे टोळके बसलेले असते .समोरुन एखादी स्त्री , मुलगी निघाली की , अश्लिल भाषेत शेरेबाजी करणे हे नित्याचेच झाले आहे .यावेळी त्यातील प्रत्येक मुलाने जो कुणाचातरी भाऊ असतो , व समोर कुणाचीतरी बहीण असते विचार केला तर , माझीही बहीण असच कुठतरी बाहेर गेली असेल व तिलाही कुणितरी चिडवत आ
असेल तर ? बस !! एवढा विचार जर प्रत्येकाने केला तर रक्षाबंधन सण साजरा केला असे होईल .

भावाबहीणींचे नाते हे अतूट आहे.ते नाते लेचेपेचे कधीच नसते.याचा पाया भक्कम असतो.सहोदर आसलेली ही दोघे एकमेकांचा विचार करणारच, आदर करणारच. त्यामुळे हे नाते अखंड टिकून राहणारे असते.

      रक्षाबंधन सणाबद्दल अनेक दंतकथा  व जिवंत ऊदाहरणे आहेत .प्रत्येक मुलीला / बहीणीला आपल्या भावाबद्दल अभिमान असतो .त्यासाठी तो सदैव तिच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतो.त्यासाठी प्रत्येकाने आपली नजर बदलली पाहीजे , विचार आपोआपच बदलतील व .हे नाते निकोप राहील .

     अशा सुंदर ,पवित्र सणाला जाणून घेऊया व समर्थ भारत बणवूया .

   श्रीमती  माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

निरागस भाव

स्पर्धेसाठी

            चित्रकाव्य

       निरागस भाव

सहजच टाकते पाय पुढे,
लचक नकळत कमरेला .
निरागस भाव चेहऱ्यावर ,
अधर सरसावले गाण्याला.

मान करुन तिरकी जरा ,
चाललीस तू झोकात अशी.
मदनीका पाऊल टाकत ,
चालली तालात जशी .

नसे तमा मज गरीबीची ,
माझ्यातच आहे रममाण मी.
घेऊनी कळशी सानुली ,
निघाले आज पाण्याला मी.

पैंजण पायी छुमछुमते ,
तालात त्याच्या मी चालते.
पाहुन माझा पोशाख असा ,
लावण्यवती ही पहा लाजते.

दरी विषमतेची समाजातील.  
कायमची मीटायला हवी .
अंधार आमच्या जीवनातील
प्रकाशवाटेवर हवा यायला.

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
9881862530
mknagave21 @gmail.com

जिवलगा

स्पर्धेसाठी

   झटपट चारोळी स्पर्धा

       विषय -- जिवलगा

जिवाला जीव देणारे
असतात सर्वच जिवलग
नाहीतर जगात भरलेत खूप
फायद्यापुरते जमले नातलग

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

रक्षाबंधन

स्पर्धेसाठी

     विषय -- रक्षाबंधन

श्रावणातील उत्सव माझा ,
आनंद देतसे मानवा .
वाट पाहते आतुरतेने ,
देतो सकलांना उल्हास .

बंधन आहे हे प्रेमाचे ,
नाही वाणवा कशाची .
रेशमाचा पवित्र धागा ,
साक्ष देतोय निखळ प्रेमाची.

नाते हे भावाबहीणींचे ,
कधीही न संपणारे ,तुटणारे.
सतत फुलतच जाणारे ,
एकमेकांना प्रेरणा देणारे .

रक्षाबंधन साजरा करु ,
स्री-जातीचा करु आदर .
परस्त्री मातेसमान मानू ,
स्त्रीशक्तीचा करु जागर .

रक्षण एकमेकांचे करु ,
जबाबदारी आहे सर्वांची.
बहीण ,घर हवे सुरक्षित तर,
जपू नाती भावाबहीणींची .

    कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Friday, 4 August 2017

जिंदगी

प्रतियोगिता के लिए

विषय -- जिंदगी

कभी खुशी कभी गम
ये है जिंदगी का खेल
ना हारो , निराश होकर
ये है हारजीत का मेल

  रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

निर्झर

स्पर्धेसाठी

     चित्रकाव्य

      निर्झर

निसर्गाच्या कुशीतले दृश्य ,
पाहताच मन आनंदले .
खळाळता निर्झर सुंदर ,
चराचर हे पाणावले .

मार्ग काढत संघर्षातून ,
देतसे मानवा संदेश .
वाटेमधल्या संकटाना ,
दे दूर जाण्याचा आदेश .

आपला मार्ग आपल्यालाच ,
आहे निवडायचा या जगी.
स्वतःबरोबर दुस-यालाही ,
आनंदी बनवायचेय जगी .

हिरवाईच्या ओंजळीतले ,
हे शुभ्रधवल आनंदी जीवन.
धावत राहते सतत सदा पुढे
झुगारुन सारे वाटेतील बंधन

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .