स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषय - बाप/ वडील
धीरोदात्त बुद्धिमान
संयमित माझे बाबा
नेहमीच ठेवतात
मनावर त्यांच्या ताबा
हस्ताक्षर मोत्यासम
शोभतात खूप छान
समाजात दिला जातो
आदरपूर्वक मान
आदर्शाचा ते पुतळा
गौरवाने गाऊ गाथा
सन्मानाने झुकवूया
चला येथे आता माथा
धिरोदात्त विचारांची
शिदोरीच बांधलेली
संस्काराच्या मुशीतून
मूर्ती यांची घडलेली
व्रत समाजसेवेचे
सहजच स्विकारले
आनंदच मिळवला
जनतेचे कार्य केले
सन्मानार्थ लवविते
माथा मी अभिमानाने
आशिर्वाद सदा घेते
नमस्कार आनंदाने
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment