परीक्षा
आई जरा ऐक ना ,
आली जवळ गं परीक्षा.
कीती करावी रोज सर्वांनी,
नकळतपणे हीची प्रतिक्षा.
कीती विषय वाचायचे ?
काही कळत नाही बाई.
एवढास जीव माझा ,
कंटाळून जाते मी आई.
टीव्ही बंद,खेळ बंद ,
करमत मला गं नाही.
तोचतोच अभ्यास करायला ,
मला अजीबात आवडत नाही.
बघूदे ना गं टिव्ही,
खेळू दे मला खेळ.
बघ मग कसा घालते मी,
अभ्यासाचा व पुस्तकाचा मेळ
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment