स्पर्धेसाठी
विषय - सख्या प्रीतझुला दे रे
स्वप्नझुल्यावर मी झुलते ,
सख्या प्रीतझुला दे रे .
सुखदःखांच्या भावना ,
मनी हिंदोळे घेती रे .
साठा स्वप्नांचा उरी ,
रोजच वाढत जातोय .
आठवणीत तूझ्या सख्या ,
हेलकावे रोजच खातोय .
प्रीतफुल्यावरील त्या आठवणी,
सलत राहती मनी सदा .
झुलायचे होते अजून मला ,
भाळायचास तू पाहून अदा .
कर्तव्याच्या झोक्यावर आपण ,
स्वार होऊन गगनी आलो .
यशपताका उंचवत जगी ,
यशाचे वाटेकरी झालो .
आज मी राहिले मी एकाकी ,
सतावतोय विरह तुझा .
सख्या प्रीतझुला दे रे ,
शांत कर अशांत जीव माझा .
कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment