Thursday, 7 June 2018

कविता ( अंधश्रद्धा निर्मूलन )

अखिल भारतीय काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय - अंधश्रद्धा निर्मूलन

अंधःकार अज्ञानाचा ,
दूर सारू या चला .
विज्ञानाच्या कसोटीवर ,
खरे उतरू या चला .

श्रद्धा हवी डोळस ,
मनाला हवी पटणारी .
नका ठेवू अंधश्रद्धा ,
उजेडात डोळे झाकणारी .

उघडी ठेवा कवाडे मनाची
सारासार विचार करा .
बुवा, बाबा, माता यांची ,
भरणारी दुकाने बंद करा .

आपली बुद्धी आपले मनगट ,
भविष्य आहे आपल्या हाती .
नका बांधू दावणीला स्वतःला ,
हिमतीने कोरा भविष्य माथी .

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड , ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर, 416106
9881862530

No comments:

Post a Comment