स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषय -- बाप
बाप बाबा तिर्थरूप,
धैर्य धाडसाचे रूप.
आधारच त्याचा सर्वां,
जसे आई प्रतिरूप.
नाही अंत या प्रेमाचा,
नाही अंत या मनाचा.
धीरोदात्त सागर हा,
जसा अथांग खोलीचा.
जगी वंद्य असतो हा,
खरा सेतू कुटुंबाचा.
चालवतो सहजच,
रथचक्र संसाराचे.
सापडतो कधीतरी,
एकट्याने रडताना.
दाखवत नाही जगी,
दु:ख त्याचे सांडताना.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा.कोल्हापूर
No comments:
Post a Comment