स्पर्धेसाठी
विषय - शाळेची तयारी
सुट्टी संपली मौजेची ,
शाळा आता सुरु झाली.
नवीन दप्तर घेण्याची ,
वेळ आता आली आली .
नवीन वह्या नवीन पुस्तके,
घेण्याची पहा झाली घाई.
नवजोमाने,नवचैतन्याने ,
हरेक बालक शाळेत जाई.
संपला आता शिण सारा ,
ऊत्साह जोम अंगी आला.
नवनवे शिकण्याचा मनात,
जोश भरुन तो आला .
नवतेजाने ऊजळून गेले,
बालकांचे सुंदर चेहरे.
जणू बुद्धीबळाच्या पटावरील,
ते सर्वात बुद्धिमान मोहरे.
झाली तयारी शाळेची ,
ऊत्सुकता शाळा सुरु होण्याची.
घाई आम्हा झाली फार ,
शाळेत आनंदाने जाण्याची.
कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment