शेल काव्यरचना
मन व्याकूळ
झालं व्याकूळ व्याकूळ मन
मन शोधतयं हो निवारा
कसं होईल ते शांत आज
आज मिळेल का हो आसरा
मन आक्रंदून सांगतय
सांगतय साऱ्या या जगाला
शांत करा हो मनाला माझ्या
माझ्या नाहीच चैन जीवाला
मन व्याकूळ आठवणीने
आठवणीने झाले बेजार
भेटायाची आस मनातच
मनातच उठवे काहूर
व्यक्त मनीच्या भावना आज
आज प्रकटण्या फुललेल्या
करुन आर्जव विनवण्या
विनवण्या हजार जाहल्या
व्याकूळ मनाच्या सतारीला
सतारीला छेडते प्रेमाने
गीत प्रेमाचे फुलु दे रोज
रोज मनी रुजू दे जोमाने.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment