Thursday, 7 June 2018

कथा ( निसर्गाचं देणं )

स्पर्धेसाठी

कथा - निसर्गाचं देणं

     आनंदवनात पाय ठेवला अन् अंग शहारून आले.मनावर एकप्रकारचे दडपण आले.आनंदवन कुष्ठरोग्यांचे वस्तीस्थान आहे एवढीच जुजबी माहिती होती. कोल्हापूर जिल्हा ते गडचिरोली जिल्हा खूप लांबचा पल्ला होता.मजलदरमजल करत एकदा आम्ही पोहचलो आनंदवनात.

तिथली परिस्थिती वेगळी होती.आनंवनातील लोकांना आम्ही कपडे नेले होते, ते तेथील ऑफीसात जमा केले .एक गोष्ट लक्षात आली की तिथे काम करणारे सगळे पुनर्वसन झालेले कुषाठरोगी होते .जरी ते या रोगातून बरे झाले असले तरी समाज त्यांना स्वीकारीत नाही हे तेथील एक पुनर्वसन झालेला व्यक्ती बोलत होता . " काय सांगू आमची व्यथा , रोग बरा झालाय पण कुणी आम्हाला जवळ घेत नाही " म्हणून आनंदवनात या सर्वांचे भाग्यविधाता श्री. विकास आमटे यांनी या सर्वांना काम दिलंय . प्रत्येकावर जबाबदारी सोपवली की प्रत्येकजण काळजीपूर्वक काम करतो. कुष्ठरोग्यांचे हाॅस्पीटल आहे , तिथे जाऊन ते औषधोपचार घेतात . विविध प्रकारची कामें सर्वजण आवडीने करतात . मानवसेवा हिच ईश्वरसेवा आहे हे समजायला तशाप्रकारची नैसर्गिक देणं असावे लागते ते या कुटुंबीयांना मिळाले आहे . खरोखरच हे देणं कीती महान आहे हे तिथे गेल्यावर प्रत्येकजण अनुभवतो .

तेथिल कमालीची स्वच्छता पाहून सर्वांचे मन भरून आले . तेथिल लोकांना स्वतःच्या पायावर ऊभे राहण्याची जी पद्धत त्यांनी अवलंबिले आहे तीही एक
निसर्गाची देणगीच आहे. तेथील अंध अपंग मुलांच्या मनात  परोपकाराची भावना दिसून येते , तीही एक नैसर्गिक देणगीच म्हणावे लागेल.

समधानाची शिदोरी अतिशय महत्वाची आहे .गोंधळलेल्या मनाला शांतता मिळवण्याचे एक ठिकाण आहे .

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड ता. शिरोळ
जिल्हा - कोल्हापूर

No comments:

Post a Comment