Tuesday, 19 June 2018

कविता ( शब्दांच्या गर्भात )

स्पर्धेसाठी

विषय- शब्दांच्या गर्भात

शब्दांच्या गर्भातून निपजले,
विचारांचे सुंदर माणिकमोती.
संदेश देऊनी सकलजनांना ,
शहाणे करुन ते सोडती .

कल्पना विलासांच्या झुल्यावर,
अलगद झुलती शब्दसुमने .
सुगंधाने शिंपण करती ,
शब्दप्रेमींची कोमल मने .

प्रसवून शब्दांचे भांडार ,
सामाजिक भान जोपासती .
अन्याय, अत्याचाराविरुद्ध ,
ठासून आवाज उठवती .

शब्दगर्भ आक्रंदतो मनात ,
साहित्यिकांच्या लेखणीतून .
जागृत करण्या जनमने ,
तरसतोय तो मनातून .

एकसंघ विचार पुस्तकातून ,
प्रकाशित होऊन आनंदतात .
जन्मोत्सवाच्या सोहळ्यात ,
सुखीसमाधानी ते होतात .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

No comments:

Post a Comment