Friday, 22 June 2018

चित्रकाव्य (सर्जा राजा )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

सर्जा राजा

जोडीनं खिल्लारी बैलांच्या,
शेत नांगरणी दादा करतोय.
दिवसभर घाम गाळून ,
कष्टाची भाकरी पिकवतोय.

काळी आई आमची माय,
सेवा तिची करु चला.
फाळ चिरतोय छाती मातीची,
मोत्याच दाणं पिकवू चला.

चल सर्जा चल राजा माझ्या,
नाही दमायच आता कधी .
पोसायचयं जगाला आपल्याला,
काम कष्टाचं करु आधी .

हिरवागार परिसर पाहून ,
जीव जातोय आनंदून .
तगमग जीवाची शांत होते,
हिरवाईची शोभा पाहून .

काळी माती आपली आई ,
सेवा तिची आज करायची.
जपून टाका पाऊल जरा ,
भविष्याची आखणी करायची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment