Saturday, 16 June 2018

कविता ( ईद मुबारक )

रमजान ईद निमित्त
काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय -- ईद मुबारक

शिर्षक --- रमजान

चांद्रदर्शनाने फुलली मने ,
हर्षाची झालर शोभते .
त्यागाच्या त्या भावनेची ,
मनी भुरळ आज घालते .

रमजान आणि भाईचारा ,
संदेश मानवतेचा देतो .
ईद-उल-फितर म्हणजेच ,
आनंदाचे दान सर्वा देतो .

भावना बंधुभावाची मनी ,
रोज वाढीस लागते .
करुनी रोजा दिवसभर ,
मन कणखर ते बनते .

होते शुद्धी तना मनाची ,
दूर मन राहते मोहापासून .
ईद- मुबारक म्हणूया आज,
गळाभेट लहानथोरांपासून .

खाऊन गोड शिरखुर्मा ,
सांगता कठीण उपवासाची.
चला करुया आज अंत ,
संपवूया भावना वैरत्वाची.

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment