Saturday, 9 June 2018

कविता मुक्तछंद ( नको वृद्धाश्रमाची वाट )

स्पर्धेसाठी

मुक्तछंद

नको वृद्धाश्रमाची वाट

आठवतो मजला बाळा
लहानपणीचा तूझा थाट
तूझे बोबडे बोल अन् तुझा तो निरागस बालहट्ट .
नाही थकलो मी कधीही पुरवली सारी तुझीच हौस
केलं तूला लायक समाजात ,
पण मी मात्र ठरलो नालायक .
कळले  दाखवणार तू वाट मला वृद्धाश्रमाची......
पण ऐक बेटा मन लावून .नको दाखवू वाट
वृद्धाश्रमाची छप्पर डोक्यावर हक्काचं असूदे
माझा परिवार सभोवती असूदे .
एवढी एक ईच्छा पुरी कर
नको दाखवू तू वाट वृद्धाश्रमाची
नाही देणार सल्ला ना उपदेश,
पोटाला चार घास दे, ऊपास घडला तरी चालेल,
दूर घरापासून करू नको ... यासाठीच केला का प्रपंच ?
नव्हते ठाऊक मजला हे .
जगलो असतो आनंदाने , नसते मारले मन दुःखाने
.केली असती सोय माझी , नसता केला खर्च तुझ्यावर...
जगलो असतो आज मानाने .
चूक माझी मलाच भोवली , माझं माझं म्हणत बसलो.
लक्ष तूमच्यावर केंद्रित केलं.ठरलो वेडा आता या जगी
संपलयं सारेच आता , जोम अंगात नाही रे , पडून राहतो कोपर-यात एका, नको दाखवू तू वाट वृद्धाश्रमाची.....

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड , ता.शिरोळ ,
जिल्हा - कोल्हापूर

No comments:

Post a Comment